…म्हणून ‘बेबी डॉल’ नाही पाहत आई-वडिलांचे ‘फोटो’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलीवूड अ‍ॅक्ट्रेस सनी लिओनी एक अशी अ‍ॅक्ट्रेस आहे तिने आपल्या करियरमध्ये अनेक चढउतार पहिले आहेत. एक वेळी होती तेव्हा सनी टॉपची पॉर्न स्टार होती. त्यानंतर तिने बॉलीवूड मध्ये पाऊल टाकले. त्यानंतर तिला अनेक टिकांना सामोरे जावे लागले. त्यानंतर तिचे परिश्रम चालूच होते आणि शेवटी तिने प्रेक्षकांचे मने जिंकली.

सनी लिओनीची पूर्ण कहाणी एक वेब सिरीज ‘करनजीत कौर : द अनटोल्ड स्टोरी’ च्या माध्यमातून समोर आली. सनीसाठी ही वेब सिरीज करणे सोपे नव्हते. परंतु सनीने हा कठीण निर्णय घेतला, कारण बायोपिकच्या स्क्रिप्टमध्ये तिच्या अडल्ट स्टोरीचा उल्लेख नव्हता.

सनीने सांगितले की, वेब सिरीजच्या शुटिंग मध्ये तिला इमोशनल लेवलवर खूप अडचणी आल्यात. कारण तिच्या जीवनातील काही कडू आठवणी ती पुन्हा जगत होती. सनी म्हणाली की, मन दुखावणार असा तो क्षण होता ज्यावेळी मी वेगवेगळ्या भूमिका करत होती. मी आई-वडिलांचे फोटो बघत नाही. कारण त्यांचे फोटो बघितल्यानंतर मला त्यांची खूप आठवण येते. परंतु सेटवर सगळे खरे फोटो होते. खूप वाईट वाटते जेव्हा आपण त्या गोष्टी पुन्हा ऐकतो आणि त्या गोष्टी काही काळापूर्वी आपल्या पालकांनी आपल्याला सांगितलेल्या होत्या. परंतु मला वेब सिरीजमध्ये सत्य दाखवायचे होते.

आरोग्यविषयक वृत्त