मुंबईतील पावसाबद्दल ‘बेबी डॉल’ सनी लिओनी ‘बेखबर’, म्हणाली…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – देशभरात मान्सूनचे आगमन झाले आहे. सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईबद्दल बोलायचे झाले तर पावसाने सर्वांचे हाल सुरु आहेत. सामान्यांसोबतच बॉलिवूड कलाकरांनाही मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांनी सोशल मीडियाद्वारे आपली परेशानी सांगितली आहे. यात बिग बी अमिताभ बच्चन पासून तर ट्विंकल खन्नापर्यंत अनेक कलाकरांचे नाव आहे. तुम्हाला माहिती आहे का, एवढे सगळे घडत असताना सनी लिओनीला मात्र पावसाची खबरही नाही.

सनीला पावसाबद्दल काहीच माहीत नाही याबाबत सनीने स्वत: खुलासा केला आहे. सनीने स्वत:चा एक फोटो पोस्ट करत लिहिले आहे की, “पाऊस येत आहे ? कळलंही नाही.” या फोटोत सनी मुंबईचे हवामान एन्जॉय करत चहा पिताना दिसत आहे.

जसे सनीचे चाहते आहेत तसेच काही तिला ट्रोल करणारेही आहेत. सेलिब्रिटी अनेकदा सोशलवर ट्रोल होताना दिसतात. सनीच्या या पोस्टबाबतही असेच काहीसे झाले. तिला ट्रोल करताना एका युजरने लिहिले की, “तुमचा फोटो खूप सुंदर आहे. परंतु हा खूप संवेदनशील मुद्दा आहे की, याच पावसामुळे एका रात्रीत 13 लोकांचा मृत्यू झाला आहे.”

आणखी एका युजरने कमेंट करत म्हटले आहे की, “खूप पाऊस येत आहे. लोकांची मदत कर.” काही युजर्सने तिचा फोटो लाईकही केला आहे. जवळपास 8 लाख लोकांनी सनीची ही पोस्ट लाईक केली आहे. मुंबईत रविवारी रात्रीपासून सतत पाऊस सुरु आहे. पूर्ण मुंबई जलमग्न झाली आहे. रस्त्यांवर सर्वत्र पाणी साचले आहे.

सिनेजगत

Video : अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत ‘बोल्ड’ सीन करताना ‘हा’ अभिनेता ‘आऊट ऑफ कंट्रोल’ !

Photo : अभिनेत्री जया प्रदा यांनी यापुर्वी देखील सहन केल्या आहेत ‘तशा’ टिका, पहा फोटो

Video : चित्रपटाच्या सेटवर ‘ढसा-ढसा’ रडला कार्तिक आर्यन

बहुजननामा

आगामी विधानसभेसाठी वंचित-काँग्रेस एकत्र आल्यास समीकरणे बदलतील

शहरातील सर्व बांधकामे तातडीने थांबवा – बाबा आढाव

आधी एक भुमिका आणि खासदार झाल्यावर एक, इम्तियाज जलीलजी, हे वागणंं बरंं न्हवं !