Video : ‘बेबी डॉल’ सनी लिओनीवर झाडली ‘गोळी’, सनी कोसळली ; पुढे झाले ‘असे’ काही

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बऱ्याच दिवसांपासून बॉलिवूडची बेबी डॉल म्हणून ओळखली जाणारी सनी लिओनी तिच्या ‘कोका कोला’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यानचे अनेक व्हिडीओ सोशलमिडीयावर धुमाकूळ घालत आहेत. यातच पुन्हा एकदा सनीचा एक व्हिडीओ पुढे आला आहे.

सनीने हा व्हिडीओ तिच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सनीला गोळी घालताना दिसत आहे. गोळी घातल्यानंतर सनी जमिनीवर कोसळते. जवळ असणारे लोक सनीला उठविण्याचा प्रयत्न करतात. पण सनी कसलाही प्रतिसाद न देता निपचित पडल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. ‘ग्राफिक वॉर्निंग… पार्ट १… आम्ही सनी लिओनीच्या वतीने हा व्हिडीओ शेअर करत आहोत जेणे करुन काल रात्री सेटवर जे काही झाले ते लोकांना कळेल’ असे कॅप्शन व्हिडीओ शेअर करत दिले आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सनीला नेमके काय झाले आहे याची चर्चा सोशलमिडीयावर रंगली आहे. सनीला नेमके काय झाले याचा शोध चाहते घेत आहेत.

यापूर्वीही सनीचा ‘कोका कोला’ या विनोदी भयपटासाठी उत्तरप्रदेशातील हिंदी बोली भाषेचे धडे घेत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ‘कोका कोला’ हा चित्रपट उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या एका घटनेवर आधारित आहे. तसेच चित्रपटाची निर्मिती महेंद्र धारीवाला करत आहेत. सनीचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त 

लहान मुलांची उंची वाढण्यासठी करा हे नैसर्गिक उपाय 

डायट प्लॅन करताय.. ? वापरा या टिप्स 

शाकाहारी व्यक्तींनी ” प्रोटीन आणि व्हिटॅमिन ” वाढवण्यासाठी खा हे पदार्थ 

जाणून घ्या “योगा” कधी करावा 

लहान मुलांनाही शिकवा हि “योगासन” होतील फायदे

 

सिनेजगत

‘या’ दिग्गज अभिनेत्याच्या पत्नीला होतं अश्‍लील व्हिडीओ पाहण्याच ‘व्यसन’

अभिनेत्री मल्‍लिका शेरावतचा मोठा ‘गौप्यस्फोट’ ; म्हणाली, ‘तसं न केल्यामुळे गमावले अनेक चित्रपट’