अरबाजच्या ‘त्या’ प्रश्नावर सनी लिओनी रडू लागली 

मुंबई : वृत्तसंस्था – चित्रपट अभिनेता अरबाज खान पुन्हा एकदा एका शो निमित्ताने चर्चेत आला आहे. त्याच्या या नवीन यूट्युब शोचे नाव ‘पिंच बाय अरबाज खान’ असून नुकतेच त्याचे ट्रेलर प्रदर्शित झाले. यामध्ये अरबाज बॉलिवूड सेलिब्रेटींना सोशल मीडियावर कमेंट केलेले प्रश्न विचारताना दिसत आहे. अशाच एका प्रश्नामुळे अभिनेत्री सनी लिओनी शोमध्येच रडली होती. त्याचा किस्साही नुकताच त्याने शेअर केला आहे.

प्रसार माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत अरबाजनं शोच्या फॉरमॅट बद्दल माहिती दिली. सेलिब्रेटींबद्दल सोशल मीडियावर नेटीझन्स जेव्हा असभ्य भाषेत कमेंट करतात किंवा प्रश्न विचारतात तेव्हा सेलिब्रेटींना नेमकं काय वाटतं. या सर्व गोष्टींना ते कसं सामोरं जातात. हाच या शोचा फॉरमॅट असल्याचं अरबाजनं यावेळी सांगितलं. तसेच एका प्रश्नामुळे सनी लिओनी कशी रडली याचाही खुलासा केला.

यावेळी अरबाजनं या शोच्या शुटींग दरम्यान सनी लिओन सोबत घडलेली एक घटना सांगितली, आम्ही जेव्हा सनीच्या सोशल प्लॅटफॉर्मवरुन आलेल्या कमेंट मधील प्रश्न पाहिले, तेव्हा त्यातील एक प्रश्न एवढा वाईट होता की तो प्रश्न ऐकल्यावर सनी रडू लागली.

अरबाज म्हणतो जर आम्हाला या प्रश्नांवर बोलताना एवढं वाईट वाटतं तर विचार करा कि, सनीवर जेव्हा असभ्य भाषेत खुलेआम टीका केली जाते तेव्हा तिला काय वाटत असेल.

यासर्व प्रकारावर अरबाज म्हणतो, सनीला विचारलेला तो घाणेरडा प्रश्न माझा नव्हता. तो सोशल मीडियावर विचारण्यात आला होता. पब्लिक डोमेनमध्ये तो प्रश्न आहे. अशा परिस्थितीत मी काय करू शकतो. अशाच प्रश्नांनी अनेक अभिनेत्री त्रस्त झाल्याचेही त्याने यावेळी सांगितलं. माझ्या प्रश्नांमुळे कोणत्याही अभिनेत्रीला त्रास होऊ नये आणि  शोमध्ये आल्यानंतर कोणाच्याही व्यावसायिक अथवा वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होऊ नये असाच माझा प्रयत्न असतो असेही अरबाजने यावेळी सांगितलं.