अन् सनी लिओनी अडकली मॉलच्या शोरूम मध्ये…. 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 

बॉलिवूड सेलीब्रेटींना पाहण्यासाठी त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी सर्वसामान्यांमध्ये भलतीच क्रेझ असते. मुंबईतील एका मॉलमध्ये  ‘क्लोदिंग ब्रँडचं स्टोर लॉन्‍च करण्‍यासाठी सनी लिओनी गेली होती. परंतु, मॉलमध्‍ये जाणे तिला चांगलेच भारी पडले. कारण, सनी लिओनी मॉलमध्ये पोहोचताच चाहत्‍यांनी तिला पाहण्‍यासाठी एकच गर्दी केली. सनी मॉलमध्ये आल्याची बातमी अगदी वाऱ्यासारखी पसरली आणि बघता बघता लोकांनी गर्दी वाढली. ही गर्दी इतकी वाढली की, लोकांना रोखणं कठिण झाले. त्‍यामुळे सनी ‘शो’ रूममधून बाहेर पडू शकली नाही.

[amazon_link asins=’B07F1D267G,B077XXRDJM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1435778e-ad05-11e8-90f8-e5d842eaef66′]

सनीसोबत तिचा पती डॅनियल देखील होता. सनीची एक झलक पाहण्यासाठी तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांची एकच गर्दी झाली. दरम्‍यान, गर्दी पाहून शोरूमचा मालक आणि डिझायनर रियाज गांजी यांनी स्टोरचे शटर आतून बंद केलं. पण, स्टोर शटर बंद करताना सेफ्टीचा विचार केला नाही त्यामुळेच  १ तास सनी शोरूम मध्ये अडकली. शटर लॉक झाल्‍याने तिला बाहेर पडता आले नाही. नंतर शटर उघडण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा लक्षात आलं की शटर बाहेरून बंद झालं आहे. नंतर मॉलच्या कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आलं आणि शटर उघडण्‍यात आलं.

पैशांचा पाऊस पाडणार्‍या मांत्रिकांचा पर्दाफाश, ५ जण अटकेत