‘बेबी डॉल’ सनी लिओनीची मुलगी निशाचं ‘होळी’ सेलिब्रेशन (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूडची हॉट अ‍ॅक्ट्रेस सनी लिओनी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. चाहत्यांसोबत नेहमीच ती आपल्या लाईफमधील अपडेट्स शेअर करत असते. पुन्हा एकदा सनी काही फोटोंमुळं चर्चेत आली आहे. सनीनं तिच्या मुलीसोबत एक फोटो शेअर केला आहे ज्यात ती तिच्या मुलीसोबत दिसत आहे. तिची मुलगी निशाच्या हातात एक पिचकारीही दिसत आहे. याशिवाय एक व्हिडीओदेखील व्हायरल होताना दिसत आहे ज्यात निशा पिचकारीनं रंग खेळताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B9b8icKnN4X/?utm_source=ig_embed

फोटोत दिसत आहे सनी लिओनी तिची मुलगी निशाला पिचकारी पकडायला शिकवत आहे. याशिवाय आणखी एका व्हिडीओत सनी मुलंसोबत पिचकारीनं रंग खेळताना दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर निशानं डेनिम फ्रॉक घातली आहे ज्यात ती खूपच क्युट दिसत आहे. निशाची ही क्युट अ‍ॅक्टीविटी सोशलवर व्हायरल होत असून चाहत्यांनाही आवडताना दिसत आहे.

निशासोबत सनीची बाँडिंगही खूप शानदार आहे. दोघी अनेक प्रसंगी एकत्र स्पॉट होताना दिसत असतात. सनी लिओनी आणि तिचा पती डॅनियल वेबर यांनी 2017 साली निशाला महाराष्ट्राच्या लातूरमधून दत्तक घेतलं होतं. तिला सरोगसीनं अशहर आणि नोह अशी दोन मुलं आहेत.