लाखो रुपये घेतले अन् काम केलंच नाही; सनी लियोनीविरोधात तक्रार दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ex – पॉर्नस्टार आणि अभिनेत्री सनी लियोनी अनेकदा काहीना काही कारणामुळे चर्चेत असते. आता ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. कोच्ची येथे होणाऱ्या दोन कार्यक्रमांसाठी सहभागी होण्यासाठी सनी लियोनीने 29 लाख रुपये घेतले होते. मात्र, ती त्या कार्यक्रमात सहभागी झालीच नाही.

सनी लियोनीने पैसे घेऊनही त्या कार्यक्रमात सहभागी झाली नाही. त्यामुळे आयोजकांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यामध्ये आयोजकांनी सांगितले, की सनी लियोनीला दोन इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी 29 लाख रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट दिले होते. पण तिथे ती गेली नाही. त्याचसंदर्भात सनी लियोनीच्या ओळखीच्या एका व्यक्तीने सांगितले, की सनी लियोनीला 12 लाख रुपये एका कार्यक्रमासाठी दिले होते. मात्र, ही सर्व रक्कम परत करण्यात आली आहे. या तक्रारीवरून केरळ पोलिसांनी सनी लियोनीची चौकशी केली. पोलिसांच्या चौकशीदरम्यान सनीच्या वतीने एका व्यक्तीने बाजू मांडली. त्यामध्ये त्याने सांगितले, की सनी लियोनी सध्या केरळमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. कोरोना महामारीमुळे सनी लियोनी कार्यक्रमात सहभागी होऊ शकत नाही. हा कार्यक्रम पाचवेळा पुढे ढकलण्यात होता आणि यामध्ये आयोजकच जबाबदार आहेत.

सनी लियोनीची प्रोफेशनल लाईफही चांगलीच आहे. देवांग ढोलकियाने दिग्दर्शित केलेली वेबसीरिज ‘बुलेट’मध्ये दिसली होती. या सीरिजमध्ये तिच्यासोबत करिष्मा तन्ना हीदेखील लिड रोलमध्ये दिसत होती. पण एमएक्स प्लेअरवर रिलीज झालेल्या सीरिजला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. आता सनी लियोनी वेब सीरिज अनामिकामध्ये दिसणार आहे. या सीरिजला विक्रम भट्ट यांनी दिग्दर्शित केले आहे.