मुंबई सोडून जायचे नव्हते पण, सनी लिओनी केला खुलासा

पोलिसनामा ऑनलाईन टीम – देशभरात कोरोनाचा हाहाकार उडाला असल्यामुळे व्हायरसपासून स्वत:ला आणि मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी अभिनेत्री सनी लिओनी गेल्या महिन्यात भारताबाहेर गेली आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत तिने लॉस एंजिलिसला गेल्याची माहिती दिली. मात्र तिला मुंबई सोडून जायचे नव्हते, असे तिने स्पष्ट केले आहे.

सनी म्हणाली, मला मुंबई सोडायची नव्हती. त्यामुळे मला इथे येण्याचा निर्णय घेण्यासाठी खूप वेळ लागला. पण डॅनिअलच्या आईसाठी आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी हा निर्णय घ्यावा लागला. अशा कठीण काळात कुटुंबीयांसोबत राहणे जास्त महत्त्वाचे आहे. लॉस एंजिलिस येथील बंगल्यात सनी व तिचे कुटुंबीय सुरक्षित असल्याचे तिने सांगितले.

त्याचसोबत आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होताच भारतात परतणार असल्याचे सनीने सांगितले आहे. मला मुंबईची फार आठवण येत आहे. जेव्हा आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होतील, तेव्हा मी परत येईन. डॅनिअल आणि मुलांनाही लवकरात लवकर भारतात परतायचे आहे. लवकरात लवकर कोरोनाचे संकट दूर होउन, विमानसेवा सुरु होण्यासाठी सनीने देवाकडे पृार्थना केली आहे.