Video : ‘बेबी डॉल’ सनी लिओनीचा कधीही न पाहिलेल्या अवतारातील फोटो सोशलवर प्रचंड ‘व्हायरल’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनी ही हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. पॉर्न इंडस्ट्रीतून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलेल्या सनीने बॉलिवूडमध्ये आज आपली वेगळी जागा तयार केली आहे. आज सनीकडे अनेक सिनेमे आहेत. अनेक सिनेमात सनीने आयटम नंबर आणि मुख्य भूमिकाही साकारल्या आहेत. सनी लिओनी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अशातच सनी तिच्या नव्या फोटोमुळे चर्चेत आली आहे. सनीने इंस्टाग्रामवरून एक फोटो शेअर केला आहे. सध्या सनीचा हा फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

View this post on Instagram

Love being a mermaid!!

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

या व्हायरल होणाऱ्या फोटोत सनी वेगळ्याच लुकमध्ये दिसत आहे. याआधी सनी कधी अशा अवतारात दिसली नाही. सध्या चाहत्यांमध्ये सनीचा हा फोटो शेअर होताना दिसत आहे. सनी या फोटोत जलपरी म्हणजेच मरमेडच्या लुकमध्ये दिसत आहे. चाहत्यांना तिचा हा लुक भलताच भावला आहे. या फोटोला सनीने खास कॅप्शनही दिले आहे. आपल्या कॅप्शनमध्ये सनी म्हणते की, “मला मरमेड होणं आवडतं.” चाहत्यांनाही प्रश्न पडला असेल की, सनी मरमेड का झाली आहे. पंरतु हा तिचा एका गाण्यातील लुक आहे. सनी खूपच सुंदर दिसत आहे. सनीचा अवतार पाहून वाटत आहे की, सनी खरंच एखादी मरमेड आहे.

सनी लिओनी लवकरच झूठा कही का या सिनेमाताली रॅपर हनी सिंगच्या गाण्यात दिसणार आहे. या गाण्यात सनी मरमेडच्या लुकमध्ये असणार आहे. या गाण्याचा टीजरही काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. तेव्हा या टीजरला चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळालं होतं.

सनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, लवकरच ती रंगीला या सिनेमातून मल्याळम फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. याशिवाय सनी कोका कोला या सिनेमातही झळकणार आहे. याव्यतिरीक्त सनी अर्जुन पटीयाला या सिनेमातही एक आयटम नंबर करताना दिसणार आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like