राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी पदी सनी मानकर

पुणे : पक्ष बळकटीसाठी आणि मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येयधोरणे विद्यार्थ्यांपर्यंत अधिकाधिक पोहोचविण्यासाठी सनी अशोकराव मानकर यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.  दिनांक २० जानेवारी २०२१ रोजी हे नियुक्ती पत्र देण्यात आले.

या आधी सनी मानकर यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव पद संभाळले आहे. त्यांच्या या कारकिर्दीचा सन्मान करत, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दुहन यांच्या हस्ते महाराष्ट्र प्रभारी पदाचे नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले.

‘राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे संघटन व त्यांच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी काम करतच आहे. यापुढे देखील अधिक जोमाने हे कार्य पुढे नेऊ’, असे सनी मानकर यांनी सांगितले.