बॉलीवूड अभिनेत्री सनी लियोन म्हणाली – ‘खरा पुरुष तोच, जो ‘या’ गोष्टीला अधिक प्राधान्य देतो’

पोलीसनामा ऑनलाइन – अनेक फिल्मधे चर्चेत असणारी बेबी डॉल स्टार बॉलीवूड अभिनेत्री सनी लियोन हिने आता समाज माध्यमावर एक फोटो प्रसारित केला आहे. हा फोटो शेअर करताना सनीने सर्वाना विचार करायला भाग पाडेल असाच एक रंजक घडलेला प्रसंग सांगितला आहे.

सनी लिओन ही पहिल्यांदा ‘बीग बॉस-५’ या रिअ‍ॅलिटी शोद्वारे २०११ मध्ये पहिल्यांदा दिसली होती. त्यानंतर ‘जिस्म-२’ या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये प्रवेश केला होता. तर आता सनीचा पती डॅनियलने एका महिलेच्या कारच्या गाडीचे टायर बदलण्यात मदत केली. सनी म्हणते, प्रत्येक पुरुषाने कठीण समयी महिलांची मदत केली पाहिजे. पती डॅनिअलच्या या कामामुळे सनी एवढी भाराहून गेली आहे की, तिने थेट पतीचे कौतुक करण्यासाठी समाज माध्यमावरच पोस्ट शेअर केली आहे. एवढेच नाही तर तिने अन्य पुरुषांनी देखील डॅनिअलसारखा दृष्टिकोन ठेवावा. त्यामुळे प्रत्येकाने महिलांना सहकार्य करा असे आवाहन सनीने केले आहे.

दरम्यान, सनीचा पती डॅनिअल आणि मुलांसोबत सनी ही कायमच पाहायला मिळते. समाज माध्यमावर सनी त्यांच्याबरोबरच फोटो शेअर करत असते. सध्या ती तिच्या मुलांसह कुटुंबासह अधिक वेळ घालवताना दिसत आहे. तसेच सनी लियोनला बॉलीवूडमध्ये येऊन अजून अधिक कालावधी झालेला नाही, अल्पावधीतच सनीने रसिकांची पसंती दर्शवली आहे.