Sunny Vinayak Nimhan | 5 % कॅन्सर मोबाईलमुळे वैज्ञानिकांचा शोध – पद्मश्री डॅा. तात्याराव लहाणे

Sunny Vinayak Nimhan
ADV

विनायकरावांच्या पावलावर पाऊल ठेवून सनी निम्हण यांनी आमदार पदावर जायला हरकत नाही: आरोग्य शिबीर उदघाटन प्रसंगी पद्मश्री डॅा. तात्याराव लहाणे यांनी केली भावना व्यक्त

पुणे : Sunny Vinayak Nimhan | पूर्वी नागरिकांच्या अन्न, वस्र,निवारा या गरजा होत्या आता त्या बरोबरच मोबाईल फोन ही मोठी गरज झाली आहे. अन्न, वस्र नाही दिले तरी चालेल अशी परिस्थिती सध्या समाजात झाली आहे . एखांद्या गेममध्ये काम दिलं जातं आणि माणूस चौदाव्या मजल्यावरू उडी टाकतो. आपण सगळे या छोट्याशा बॅाक्समुळे वेडे झालो आहोत. मोबाईल जास्त वेळ वापल्यावर आपला कान दुखतो तरी आपण तो कानालाच लावून धरतो. सध्या वैज्ञानिकांनी शोध लावला आहे की, पाच टक्के मेदूचे कॅन्सर हे मोबाईलमुले झाले आहेत. अशी धक्कादायक माहिती पद्मश्री डॅा. तात्याराव लहाणे (Tatyarao Lahane) यांनी प्रसंगी दिली.

‘सोमेश्वर फाऊंडेशन’ (Someshwar Foundation Pune) तर्फे आयोजित कार्यसम्राट मोफत महा- आरोग्य शिबीराचे (Maha Health Camp) उदघाटन रविरवार (ता.४) सकाळी, शासकीय कृषी महाविद्यालय मैदान, सिंचन नगर, शिवाजीनगर या ठिकाणी झाले, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री डॅा. तात्याराव लहाणे बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, नागरिकांनी मोबाईलचा वापर कमी केला पाहिजे असा मोलाचा सल्ला देखील त्यांनी दिला, तसेच आरोग्य विषयी काळजी कशी घेतली पाहिजे याचे मार्गदर्शन केले. दिवंगत आमदार विनायक निम्हण आणि माझी मैत्री वैचारिक भांडणातून झाली हे सांगून डॅा. लहाणे यांनी दिवंगत आमदार विनायक निम्हण यांच्या आठवणींना उजाळा दिला.

धो -धो पाऊस असला तरी ३६ ठिकाणाहून बसेस येत आहेत, त्या बसमधून रूग्ण येत आहेत. सोळा स्पेशालिटी, आठ सुपर स्पेशालिटी रूग्णालयातील तज्ज्ञ डॅाक्टर या ठिकाणी सर्वसामान्या रूग्णांना तपासत आहेत. रूग्णांची तपासणी, नाव नोंदणी केली जात आहे. त्यानंतर त्यांच्या शस्रक्रिया केल्या जात आहेत. पावसातही रूग्णांची तपासणी, प्रथमोपचार करणे, त्यांना घरून घेऊन येणे, पुन्हा घरी सोडणे ही अतिशय चांगली गोष्ट आहे. या आरोग्याविषयी कामासाठी सनी निम्हण यांचे अभिनंदन करतो, सनी निम्हण यांनी विनायकरावांच्या पावलावर पाऊल ठेवत आता आमदार पदावर जायला काही हरकत नाही.” अशा भावना पद्मश्री डॅा. तात्याराव लहाणे यांनी व्यक्त केल्या.

यावेळी आमदार सत्यजित तांबे, माजी मंत्री सुरेश नवले, माजी आमदार शाम सावंत, माजी आमदार सुभाष बणे, माजी महापौर दत्ता गायकवाड, माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, मुख्यमंत्री वैधकीय सहाय्यता निधी कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, निरामय सेवा फाऊंडेशनचे रामेश्वर नाईक, महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज.बी, महापालिका उपायुक्त महेश पाटील, पोलिस अधीक्षक , पुणे ग्रमिण पंकज देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. (Sunny Vinayak Nimhan)

प्रत्येक रूग्णांच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना हेच सनीच्या यशाचं रहस्य – आमदार सत्यजीत तांबे

“असा कार्यक्रम शहरात कुठेही होत नसेल असा कार्यक्रम सनी निम्हण यांनी केला आहे. ना भुतो,ना भविष्यती असा कार्यक्रम सनीच्या माध्यमातून पुणे शहरामध्ये होत आहे.

दरवर्षी या कार्यक्रमाची उंची वाढत चालली आहे. सनी सारखे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत,
जे समाजासाठी काम करतात अशा लोकांनी आता मोठ्या जबाबदाऱ्या घेण्यासाठी देखील तयार झालं पाहिजे असं माझ्यासारख्या मित्राला वाटतं.
शिबीराची पाहणी करत असताना रूग्णांच्या चेहऱ्यावरील भावना पाहिल्या,
प्रत्येक रूग्णांच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना आहे
की, आपल्यासाठी आपली काळजी घेणारं या समाजामध्ये कोणीतरी आजही उपलब्ध आहे,
समाजाची एकंदर परिस्थिती पाहता, आज आपण पाहतो की, स्वता:चे, आपले लोक देखील आपल्या घराची काळजी घेण्यामध्ये कुठेतरी कमी पडताना पाहतो.
अशा परस्थितीत सनी सारखा युवा कार्यकर्ता आपल्या वडिलांच्या जयंतीनिमित्त हजारो रूग्णांना सेवा देण्याचं काम करतो.
सर्व प्रकारचे ट्रस्ट या ठिकाणी मदतीला आले आहेत. येणाऱ्या काळात निम्हण परिवार पुणेकरांच्या सेवेसाठी कायम तत्पर राहील असा विश्वस आहे.

समाजातील गरिबांसाठी शिबीर वरदान – अभिनेते प्रविण तरडे

“अतिशय सुंदर उपक्रम कसा राबवावा हे विनायकशेठ यांच्याकडूनच सगळे शिकले आहेत,
सनीचं कौतूक यासाठी की, तो हा उपक्रम तितक्याच ताकदीने पुढे घेऊन जातोय.
पुण्यामध्ये बोललं जायचं की, उपक्रम कसा असावा? तर विनायकशेठ यांनी घेतल्यासारखा पाहिजे.
समाजातील दिन दुबळे , गरीब वर्गासाठी शिबीर वरदान ठरत आहे.
सनीने नगरसेवक असतान चांगले काम केले आहे. आता एक पाऊल पुढे टाकूण काम केले पाहिजे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar NCP Vs Sharad Pawar NCP | अजित पवारांना धक्का, माढ्याचे आमदार शिंदेनी घेतली शरद पवारांची भेट;
राजकीय वर्तुळात खळबळ

Pune Crime News | सराईताकडून पिस्टल हस्तगत ! येरवडा तपास पथकाकडून तिघांना अटक

Pune Rains | पुण्यात पुन्हा मुसळधार पाऊस; धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु; पूर परिस्थिती भागात लष्कर, एनडीआरएफ तैनात

Eknath Shinde On Pune Flood | पुण्यात पाण्याखाली गेलेल्या वाहनांना तातडीने इन्शुरन्स मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रशासनाला निर्देश

Total
0
Shares
Related Posts