‘शॉर्ट’ ड्रेस घालून ‘बेबी डॉल’ सनीनं मारला ‘पोछा’ ! ‘अदा’ पाहून चाहते म्हणाले- ‘Wowww’ (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूडची हॉट अ‍ॅक्ट्रेस सनी लिओनी नेहमीच आपल्या हॉट फोटोंमुळे चर्चेचा हिस्सा बनताना दिसत असते. अलीकडेच सनीनं बिकिनी फोटोंनी सोशलवर धुमाकूळ घातला होता आणि इंटरनेट हादरून दिलं होतं. यानंतर आता तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

सनीनं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात ती पोछा मारताना दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं शॉर्ट ड्रेसही घातला आहे. यात खूपच हॉट दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना सनीनं खास कॅप्शनही दिलं आहे. आपल्या कॅप्शनमध्ये सनी म्हणते, “हमममम….. जर मला पोछा मारण्यासाठी मजबूर केल तर…”

सनीनं जसा हा व्हिडीओ शेअर केला तसा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसला. सनीच्या अनेक चाहत्यांनी यावर कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. तिचा लुक सर्वांनाच आवडला आहे.

सनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर नुकतीच तिची रागिनी एमएमएस रिटर्न्स 2 ही वेब सीरीज अल्ट बालाजी आणि ZEE5 वर रिलीज झाली होती. सनी सध्या 2 टीव्ही शो करत आहे. तिच्याकडे एक हिंदी आणि एक साऊथचा सिनेमा आहे जो तिच्या प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनत आहे. सनी सिटी मीडिया अँड एंटरटेंमेंट असं या प्रॉडक्शन हाऊसचं नाव आहे. परंतु सध्या लॉकडाऊन असल्यानं सारं काही ठप्प आहे.