
Sunny XI Cup Championship Cricket Tournament | ‘सनी इलेव्हन करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; ऑक्सिरीच, एमईएस संघांचा अंतिम फेरीत प्रवेश !!
पुणे : सनी इलेव्हन तर्फे आयोजित ‘सनी इलेव्हन करंडक’ अजिंक्यपद (Sunny XI Cup Championship Cricket Tournament) क्रिकेट स्पर्धेत ऑक्सिरीच आणि एमईएस या संघांनी अनुक्रमे खराडी जिमखाना आणि आर्यन क्रिकेट क्लब या संघांचा पराभव करून स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
सहकारनगर येथील शिंदे हायस्कूल मैदानावर झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात यश नहार याच्या कामगिरीमुळे एमईएस संघाने आर्यन क्रिकेट क्लबचा १८ धावांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली. पहिल्यांदा फलंदाजी करताना एमईएस संघाने १६३ धावा धावफलकावर लावल्या. वरूण गुजर याने ४८ धावांची तर, यश नहार याने ४६ धावांची खेळी करून संघाला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना आर्यन क्रिकेट क्लबची सुरूवात खराब झाली. सामन्याच्या पहिल्याच षटकामध्ये संघाचा सलामीवर बाद झाला. आर. तिडके ६६ धावा आणि कौशल तांबे याने २७ धावा करून संघाचा डाव सावरण्याच्या प्रयत्न केला. पण ठराविक अंतराने त्यांचे फलंदाज बाद होत गेले व त्यांचा डाव १४५ धावांवर मर्यादित राहीला.
धीरज फटांगरे याच्या ९९ धावांच्या खेळीच्या जोरावर ऑक्सिरीच संघाने खराडी जिमखाना संघाचा १३६ धावांनी
सहज पराभव करून अंतिम फेरी गाठली.
सामन्याचा संक्षिप्त निकालः उपांत्य फेरीः
ऑक्सिरीचः २० षटकात ७ गडी बाद २१० धावा (धीरज फटांगरे ९९ (५१, ५ चौकार, ९ षटकार), हर्षल काटे ३४,
ऋषभ राठोड २७, सौरभ दोडके ३-४९, नवीन कटारीया २-५३) वि.वि. खराडी जिमखानाः १३.२ षटकात १० गडी बाद
७४ धावा (नवीन कटारीया १६, हर्षल काटे २-७, धीरज फटांगरे २-१६); सामनावीरः धीरज फटांगरे;
एमईएसः २० षटकात ९ गडी बाद १६३ धावा (वरूण गुजर ४८, यश नहार ४६, हरी सावंत ३-३१, आयुष काब्रा २-२४)
वि.वि. आर्यन क्रिकेट क्लबः २० षटकात ६ गडी बाद १४५ धावा (आर. तिडके ६६ (४४, ६ चौकार, ५ षटकार),
कौशल तांबे २७, वैभवी गोसावी २-५२, दीपक डांगी १-९); सामनावीरः यश नहार;
Web Title : Sunny XI Cup Championship Cricket Tournament | ‘Sunny XI Cup’ Championship Cricket Tournament; Oxireach, MES teams enter finals!!
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा