‘JNU’ चा माजी विद्यार्थी नेता कन्हैयाच्या ताफ्यावर ‘दगडफेक’, कुमार जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारच्या सुपौलमध्ये जेएनयूचा विद्यार्थी संघटनेचा माजी नेता कन्हैया कुमारच्या ताफ्यावर काही लोकांनी दगडफेक करत हल्ला केला आहे. या हल्ल्यात गाडी चालकांच्या डोक्याला गंभीर मार लागला तर कन्हैया कुमार देखील जखमी झाला आहे. दोघांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एक सभा करुन सहरसाच्या दिशेने जाणाऱ्या कन्हैया कुमारवर काही लोकांनी दगडफेक केली. ही घटना मल्लिक चौक पोलीस हद्दीतील आहे. या हल्ल्यात गाडीचे देखील मोठे नुकसान झाले. गाडी चालकाच्या डोक्याला मार लागला. तर कन्हैया कुमार जखमी झाला आहे.

याआधी कन्हैया कुमार सीएए आणि एनआरसीच्या विरोधात सुरु असलेल्या एका सभेत सहभागी होण्यासाठी नेमनमा गावात पोहचला होता. तेथे त्याने लोकांना मदतीचे आवाहन करत उपस्थितांना डब्यात रक्कम जमा करण्याची विनंती केली. जेणे करुन सीएए आणि एनआरसीविरोधात लढा कायम ठेवता येईल.