बहीण सुनैनाच्या मुस्लीम बॉयफ्रेंडबाबत हृतिक रोशन केलं ‘हे’ वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अनेक दिवसांपासून सुप्रसिद्ध अभिनेता ऋतिक रोशन यांच्या घरात मतभेद चालू आहे. या मतभेदाचे कारण म्हणजे ऋतिकची बहिण सुनैना रोशन हीचे एका मुलासोबतचे रिलेशन. सुनैनाचा बॉयफ्रेंड मुस्लिम असल्याकारणाने रोशन परिवार सध्या सुनैनावर नाराज आहे. त्यांनी सुनैनाच्या बॉयफ्रेंडला दहशतवादी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे तिने अभिनेत्री कंगना रणौतचा पाठिंबा असल्याचे ट्विट केले होते. सुनैनाने कंगनाची बहिण रंगोलीकडे मदत मागितली होती. घरातली सगळे नाराज असल्याने या विषयावर कोणीच काही बोलत नाहीये. पण आता एका मुलाखतीत ऋतिकने याविषयावर प्रतिक्रिया दिली आहे.

ऋतिकने एका मुलाखतीत म्हटले की, ‘ही आमच्या घरातील पर्सनल गोष्ट आहे. माझी बहिण अशा परिस्थीतीमधून जात आहे की, तिला काही बोलणे चुकीचे आहे. यामध्ये माझे कुटुंब अडकले आहे. तिच्या बॉयफ्रेंडच्या धर्माबद्दल माझ्या घरातील लोक बोलतही नाही आणि त्या गोष्टीला महत्व देत नाही. कारण आमचे कुटुंब यामुळे खचून जाईल.’

सुनैनाने एका मुलाखतीत सांगितले की, ती एका रुहैल आमीन नावाच्या काश्मिरी पत्रकाराला डेट करत आहे. त्या मुलाची आणि सुनैनाची ओळख एका मुलाखतीत झाली. ती म्हणते आमच्या नात्याला घरचा विरोध आहे. कारण तो मुस्लिम आहे. यामुळे तिचा भाऊ ऋतिकसुद्धा परिवाराच्या मताशी जोडलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये घरातील सर्व लोक तिला मारहाण करतात, असा तिचा आरोप आहे.

एका मुलाखतीमध्ये रुहैलने स्पष्ट सांगितले की, ‘ही खूप वाईट गोष्टी आहे की, कोणालाही त्याच्या धर्मावरुन बोलणे अपमानकारक आहे. आज सर्वांनी याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. सुनैना आणि मी एका कंपनीसाठी एंटरटेनमेंट कव्हर करण्याच्या वेळी भेटलो होतो त्यानंतर आमचा पुर्णपणे संपर्क तुटला आणि पुन्हा एकदा सोशल मिडियाच्या माध्यमातून भेटलो.’

अभिनेता ऋतिक रोशन त्याचा आगामी चित्रपट ‘सुपर 30’ च्या प्रमोशनसाठी व्यस्त आहे. या चित्रपटात त्याने गणित शिक्षकाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट १२ जुलैला प्रदर्शित होणार आहे.

 

 

सेक्सलाईफमध्ये आनंद मिळवण्यासाठी घ्या ‘हा’ आहार

डायबिटीज, सर्दी, ताप, कावीळ या आजारांवर भेंडी आहे गुणकारी

औषध न घेताही नियंत्रणात ठेवू शकता कोलेस्टेरॉल, हे आहेत ५ उपाय

केवळ पौष्टिकच नाही तर औषधीही आहे ‘उडीद डाळ’ ; जाणून घ्या फायदे

उपचाराबाबत निष्काळजीपणा केला तर ‘डॉक्टरांवर’ होणार कारवाई