योग्य आहार घेऊनही खुलवता येते ‘नखांचे’ सौंदर्य ; मॅनिक्युअरची गरजच नाही

पोलीसनामा ऑनलाईन टीम – महिला चेहरा सुंदर दिसावा म्हणून जेवढी काळजी घेतात तेवढीच काळजी आपले हात सुंदर दिसावेत म्हणून घेत असतात. अनेक महिला प्रत्येक महिन्याला मॅनिक्युअर, पेडिक्युअर करून घेतात. नखांचे सौंदर्य खुलवण्यासाठी या ब्युटी ट्रीटमेंट घेतल्या जातात. परंतु, यामुळे नखांचे सौंदर्य केवळ बाहेरून खुलवता येते. नखांचे सौंदर्य आतूनही खुलवायचे असल्यास काही घरगुती उपाय सहज करता येऊ शकतात. काही पदार्थांचा आहारात समावेश केल्यास नखांचे आरोग्य चांगले रहाते.

नखांचे आरोग्य वाढविण्यासाठी दूध खूप महत्वाचे आहे. दूध जसे हाडे आणि दातांसाठी लाभादायक आहे त्याचप्रमाणे ते नखांसाठी देखील उपयोगी आहे. दुधातील कॅल्शिअममुळे नखे कडक होतात. केळी खाण्यानेही नखांचे आरोग्य चांगले रहाते. केळ्यातील व्हिटॅमिन बी-६, झिंक नखांना चकाकी देते आणि नखं सुंदर दिसतात. तसेच गाजरातील व्हिटॅमिन ए नखांना चकाकी देण्यासाठी आणि हाडांना मजबुती देण्यासाठी फायदेशीर ठरते.अंड्यातही प्रोटिन भरपूर प्रमाणात असल्याने नखांना मजबुती आणि संरक्षण देण्यासाठी अंडी खावीत. टोमॅटोतील लिकोपिन घटकामुळे नखांना चकाकी आणि मजबुती मिळते.

ब्रोकोलीमध्ये आयर्न असते, जे ऑक्सिजन सर्क्युलेशनसाठी फायदेशीर आहे. ब्रोकोलीच्या सेवनाने नखे रंगहिन होत नाहीत आणि मजबूत राहतात. रताळ्यातील बिटा केरोटिन नखांना निरोगी बनवते, नखांना चकाकी मिळते. पाण्यामुळे डिहायड्रेशनची समस्या निर्माण होत नाही. नखं कमजोर होणे, कोरडी पडणे, पिवळी पडणे, निस्तेज होणे अशी समस्या निर्माण होत नाही. नखं कोरडी पडत नाहीत. यासाठी भरपूर पाणी पीणे हे नखांसाठी लाभदायक आहे.

You might also like