योग्य ती काळजी घेतली नाही तर जीवघेणे ठरू शकतात ‘हे’ Superbugs !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  जेव्हा आपण अँटी बायोटीकचा डोस घेतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की, आपल्या शरीरातून बॅक्टेरिया नष्ट झाले आहेत. परंतु काही दिवसांपूर्वीच झालेल्या एका रिसर्चमध्ये अनेक नवीन बॅक्टेरिया समोर आले आहेत. या बॅक्टेरियांवर अँटी बायोटीकच्या जुन्या डोसचा अजिबात प्रभाव दिसत नाही. त्यामुळं हे बॅक्टेरिया दरवर्षी अनेक लोकांचा जीव घेत आहेत.

सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रीव्हेन्शन द्वारे करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे की, एकट्या अमेरिकेत दर तासाला सुपरबग्स म्हणजेच नव्या बॅक्टेरियामुळं 4 लोकांचा जीव जात आहे. या रिपोर्टमध्ये आरोग्य संदर्भातही एवढ्या गोष्टी सांगितल्या आहेत ज्यामुळं भीती वाटणंही साहजिकच आहे.

याच रिपोर्टच्या आधारावर तज्ज्ञांनी सांगितलं आहे की, पुढील काळात अँटी बायोटीक प्रभावी ठरणार नाहीत याबद्दल अजिबात दुमत नाही. याआधीही याची उदाहरणं पाहायला मिळाली आहेत. विशेष म्हणजे या बॅक्टेरिया द्वारे वाढवण्यात आलेल्या अँटी रेसिस्टन्सिला पकडण्यात यश आलं नाही ही बाब मात्र विचार करण्यासारखी आहे.

इंफेक्शन कोणतंही असो, ते दूर करण्यासाठी वैज्ञानिक सतत नव्या अँटी बायोटीकवर काम करत असतात. परंतु नव्या पर्यायांचा विकास हा कायमच हुळवार आणि खूप महागडा असतो. सीडीसीनुसार, या स्थिती सोबत दोन करण्यासाठी व्हॅक्सिनेशन हा आजच्या काळातील सर्वात चांगला पर्याय आहे. कारण आपल्याला संक्रमण होण्याआधीच शरीर त्यासोबत लढण्यासाठी तयार असतं. याच गांर्भीयानं जर याकडे पाहिलं तर आपल्याला अँटी बायोटीक्सचीही गरज पडणार नाही.