55 वर्षीय सुपर मॉडलनं तयार केला ‘फिमेल’ वायग्रा, जोडप्यानं शेअर केला सेवन केल्यानंतरचा ‘तो’ सगळा अनुभव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सुपरमॉडेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एले मॅकफर्सन हिनं(Elle Macpherson) एक अशी पावडर लाँच केली आहे जी महिसांसाठी व्हायग्राप्रमाणे काम करते. ऑस्ट्रेलियाची रहिवाशी असणारी एलेनं या पावडरची विक्रीही सुरू केली आहे. 14 दिवसांच्या कोर्ससाठी याची किंमत 7900 रुपये ठेवण्यात आली आहे.

एलेनं या पावडरचं नाव द सुपर बुस्टर वुमेन लिबिडो अँड हार्मोन ठेवलं आहे. एले वेलेको( welleco) हा लाईफस्टाईल ब्रँड चालवते. हा ब्रँड जगभर फेमस आहे.

एका रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार 55 वर्षीय एलेचं म्हणणं आहे की, या पावडरमुळे तिची सेक्स लाईफ खूप चांगली झाली आहे. जेव्हा तिला लो फील होतं किंवा मग तणावपूर्ण वाटतं तेव्हा या पावडरची तिला खूप मदत होते असं ती सांगते.

एलेचं म्हणणं आहे की, ही पावडर पूर्णपणे हर्बल आणि नॅचरल आहे. या पावडरमुळे महिलांचे हार्मोन्स आणि एनर्जी बॅलन्स राहते.

केली आणि अ‍ॅडम नावाच्या कपलनं द सुपर बुस्टर ही पवाडर ट्राय केली. यानंतर त्यांनी आपला अनुभव सांगितला. त्यांना खूप चांगला अनुभव सांगितला. केलीनं सांगितलं की, खूप एनर्जी मिळाली. त्यांचं लव मेकिंग जवळपास दोन तास सुरू होतं.