सुपरस्टार रजनीकांत ब्लड प्रेशरच्या त्रासामुळे अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल, हॉस्पिटलने जारी केले स्टेटमेंट

हैद्राबाद : वृत्तसंस्था – सुपरस्टार रजनीकांत यांना शुक्रवारी सकाळी हैद्राबादच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करण्यात आले आहे. रजनीकांत यांना ब्लड प्रेशरसंबंधी त्रास होता, ज्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होता. याबाबत आपोलो हॉस्पिटलकडून ऑफिशियल स्टेटमेंट जारी करण्यात आले आहे. हॉस्पिटलकडून सांगण्यात आले की, रजनीकांत यांना ब्लड प्रेशरसंबंधी त्रास होता ज्यावर उपचार सुरू आहे.

कोरोना टेस्ट निगेटिव्ह
रजनीकांत मागील 10 दिवसांपासून हैद्राबादमध्ये फिल्मची शूटिंग करत होते. शूटिंगच्या सेटवर उपस्थित दोन लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. ज्यानंतर 22 डिसेंबरला रजनीकांत यांनी सुद्धा आपली कोरोना टेस्ट केली होती. मात्र, त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली. यानंतर रजनीकांत आयसोलेशनमध्ये आहेत.

ब्लड प्रेशरची समस्या
मात्र, त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळली नाहीत, पण त्यांच्या ब्लड प्रेशरमध्ये खुप बदल दिसून येत आहेत. याचा कारणामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. येथे डॉक्टर्सची टीम त्यांची देखरेख करत आहे. ठिक झाल्यानंतरच रजनीकांत यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येईल.

राजकारणात एंट्री
बॉलीवुड आणि टॉलीवुडमध्ये टॉपवर असणारे सुपरस्टार रजनीकांत आता लवकरच राजकारणात पाऊल टाकणार आहेत. त्यांनी एका ट्विटद्वारे सांगितले की, ते 31 डिसेंबरला आपल्या राजकीय पक्षाची घोषणा करणार आहेत.