३ हजार रुपयांची लाच स्विकारणारा महापालिकेचा मुकादम अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – रजा न मांडता हजेरी लावण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्विकारताना महापालिकेतील मुकादमाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. गणपत बुधाजी भालचीम (वय-४४ रा. यशोधा अपार्टमेंट, खणभाग, सांगली) असे लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या मुकादमाचे नाव आहे. ही कारवाई आज तो राहत असलेल्या अपर्टमेंटमध्ये करण्यात आली.

तक्रारदार हे महापालिकेच्या आरोग्य विभागात बदली कर्मचारी म्हणून काम करतात. काही कारणास्तव ते गेली काही दिवस कामावर गेले नव्हेते. दोनच दिवसांपूर्वी ते कामावर हजर झाले होते. त्यांनी मुकादम गणपत याची भटे घेऊन रजा न मांडण्याची विनंती केली. रजा न लावण्यासाठी मुकादम गणपत याने तक्रारदाराकडे तीन हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने सांगील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली.

पथकाने पंचासमक्ष पडताळणी केली असता मुकादम गणपत याने तो राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये लाच स्विकारण्याचे मान्य केले. त्यानुसार पथकाने गणपत राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये सापळा रचला. आज दुपारी गणपतला तीन हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक राजेंद्र साळुंखे, हवालदार जितेंद्र काळे, संजय कलगुटगी, संजय संकपाळ, अविनाश सागर, अश्विनी कुकडे राधीका माने व बाळासाहेब सरगर यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

आरोग्य विषयक वृत्त-
‘या’ आयुवेर्दिक उपायांमुळे तणाव होईल दूर
अंघोळ करताना तुम्ही ‘या’ चूका तर करत नाही ना ?
अंघोळ करताना तुम्ही ‘या’ चूका तर करत नाही ना ?

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like