माओवादी संबंध प्रकरणात दुसरे दोषारोपपत्र दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात पुणे पोलिसांनी विशेष न्यायालयात पुरवणी दोषारोप पत्र सादर केले आहे.यात आणखी चार जणांचा समावेश आहे.

पोलिसांनी गुरुवारी 1 हजार 837 पानांचे पुरवणी दोषारोपपत्र विशेष न्यायाधीश किशोर वढणे यांच्या न्यायालयात सादर केले. अटक आरोपी सुधा भारद्वाज, वरवरा राव, अरुण फरेरा आणि वर्णण गोन्साल्विस यांच्यासह फरार आरोपींविरूध्द यात आरोप ठेवले आहेत. यापूर्वी सुधीर ढवळे, रोना विल्सन, प्रा. शोमा सेन, महेश राऊत, ऍड. सुरेंद्र गडलिंग आणि भूमिगत असलेले कॉ. एम ऊर्फ मिलिंद तेलतुंबडे, किशनदा ऊर्फ प्रशांत बोस, प्रकाश ऊर्फ नवीन ऊर्फ रितुपण गोस्वामी, कॉ. दिपु आणि कॉ. मंगलु अशा दहा जणांविरोधात गेल्या वर्षी नोव्हेबर महिन्यात 5 हजार 160 पानी दोषारोपपत्र दाखल केले होते.

पोलिसांनी केलेल्या तपासानुसार राव हा.रिव्होल्युशनरी डेमोक्रॅटिक फ्रंट अध्यक्ष असून हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय परिषदेत उपस्थित होता. पी. पी. एस. सी या प्रतिबंधित संघटनेच्या प्रमुखांपैकी भारद्वाज या एक आहेत. या आरोपींनी निधी उभा करणे, निधीचा विनियोग बेकायदेशीर कृत्यांसाठी करणे,संदेशाची देवाण घेवाण करणे, माओवाद्यांच्या ध्येय धोरणांची अंमलबजावणी करणे आदि गुन्हे केले आहेत. माओवाद्यांनी भारतातील लोकशाही व्यवस्था उलथवून टाकण्याचा कट रचला असुन यात आरोपींचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.आरोपींनी शहरी भागात आघाडीच्या संघटना स्थापन करून देशविरोधी कृत्य आणि शासन व्यवस्था उद्धव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. हा कट त्यांनी माओवादी या प्रतिबंधित संघटनेच्या सदस्यांची संगनमत करून केलेला आहे. पोलिसांनी आरोपींच्या घरात घेतलेल्या झडतीत मिळालेली कागदपत्रे संगणकाची हार्ड डिस्क आधी गोष्टींचाही उल्लेख आरोप पत्रात केलेला आहे.

You might also like