बाळासाहेबांचं स्वप्न पुर्ण होणार ! मुख्यमंत्री शिवसेनेचाच, राष्ट्रवादी अन् काँग्रेसचा पाठिंबा मिळाला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीनंतर सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाला राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं होतं. मात्र, भाजपनं शिवसेना सोबत नसल्यानं आम्ही सत्ता स्थापन करू शकत नाही असं राज्यपालांना भेटून सांगितलं. त्यानंतर राज्यपालांनी दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं. अवघ्या काही तासात शिवसेनेनं भाजपसोबत असलेली युती तोडून सत्तास्थापनेचा दावा करत आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, युवा सेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे हे काही वेळात राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत.

काँग्रेसची पाठिंब्याची दोन पत्र तयार आहेत असं सुत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री शिवसेनेचाच हे आता निश्चित झाला आहे. दरम्यान, सत्तास्थापनेसाठी शिवसेनेचे नेते राजभवानाच्या दिशेने रवाना झाले आहेत.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार तसेच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची चर्चा करून बाकीच्या गोष्टी म्हणजेच खाते वाटप आणि इतर गोष्टींच्या बाबतीत निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Visit : Policenama.com