वाहतूकीचे योग्य व्यवस्थापन होण्यासाठी विद्यार्थ्यांचे सहकार्य मोलाचे : के. व्यंकटेशम

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

शहरामध्ये वाहतूककोंडी, वायुप्रदूषण या समस्या नियमितपणे आपल्याला भेडसावत आहेत. शहरात होणारी वाहतूक कोंडी फोडून वाहतुकीचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी पोलिसांना विद्यार्थ्यांकडून मिळणारे सहकार्य मोलाचे आहे. शहरतील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या कार्यात सामावून घेण्यासाठी पुणे पोलीस प्रयत्नशील आहेत, असे पोलीस आयुक्त डॉ. के व्यंकटेशम् यांनी केले. येवलेवाडी येथील केजे शिक्षण संस्थेच्या केजे अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयातर्फे आयोजित ‘गो सायकल रॅली’चे उद्घाटन डॉ. व्यंकटेशम यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’99711326-cbba-11e8-bb0d-096ce4ce104f’]

खडीमशीन चौक ते बोपदेव घाटाच्या पायथ्याशी असलेल्या केजे शिक्षण संकुलापर्यंत ही रॅली निघाली. संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव, खजिनदार विनोद जाधव, कार्यकारी संचालक डॉ. हेमंत अभ्यंकर, डॉ. व्यासराज काखंडकी, प्राचार्य डॉ. सुहास खोत, डॉ. हरिभाऊ फाकटकर, डॉ. निलेश उके यांच्यासह जवळपास ३०० सायकलस्वार यामध्ये सहभागी झाले. ‘स्वच्छ पुणे ग्रीन पुणे’, ‘माय क्लीन इंडिया’, ‘सायकल वापरा प्रदूषण टाळा’ अशा घोषणा देत प्रदूषणमुक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा नारा या रॅलीतून देण्यात आला.

डॉ. के. व्यंकटेशम म्हणाले, ‘महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपला काही वेळ समाजासाठी द्यायला हवा. राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत अनेक विद्यार्थी यामध्ये सहभागी होत असतात. पोलिसांसमोर अनेक समस्या आहेत. वाहतूक व्यवस्थापनासाठी विद्यार्थ्यांचा चांगला उपयोग होईल. त्यामुळे प्रत्येक महाविद्यालयाने काही ठिकाणे निवडून तेथील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी पोलिसांना सहकार्य करावे. शक्यतो सायकलींचाच वापर करावा, जेणेकरून रस्त्यावर मोठी वाहने येणार नाहीत आणि वाहतूक कोंडी होणार नाही. शिवाय वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषण होणार नाही.’
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9fc19712-cbba-11e8-953f-7f7c591c1caa’]

महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या ९० प्रवाशांना दंड

भुसावळ : गाडी क्रमांक १२७८० अप हजरत निजामुद्दीन-गोवा एक्सप्रेसच्या महिला डब्यात प्रवास करणाऱ्या ९० प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. गोवा एक्सप्रेसच्या महिला डब्यांमध्ये पुरुष प्रवासी प्रवास करीत असतानाचा प्रकार गाडी भुसावळरेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक तीनवर सोमवारी सकाळी ७.३० वाजता आली असता लक्षात आले. फलाटावरील कर्तव्यावर असलेले रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक दिनेश नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जे.एल.शहा, उपनिरीक्षक लवकुश शर्मा, संजय पाटील यांनी प्रवाशांना उतरवून रेल्वे कोर्टात नेले. तेव्हा प्रत्येकी १०० प्रमाणे ९० प्रवाशांना नऊ हजाराची दंडात्मक कारवाई केल्यानंतर सोडण्यात आले.