अहमदनगर : गुलालासोबत चांगल्या मंत्रिपदासाठी राठोडांना साथ द्या : फुलसौंदर

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन  – शिवसेनेचे उपनेते माजी आ. अनिल राठोड यांना मातोश्रीवरून गुलाल घेवून या अन मंत्रीपद घेवून जा, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे शहरातील जनतेने राठोड यांना चांगले मताधिक्क्य देऊन शहराच्या विकासासाठी विजयी करावे. चांगली मदत केल्यास चांगले मंत्रीपद मिळेल. त्यासाठी नगरकरांनी जास्त ताकद लावावी, असे आवाहन शहराचे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांनी केले.

भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारार्थ भाजपा कार्यालय येथून प्रचारफेरी काढण्यात आली होती. याप्रसंगी ज्येष्ठ नेते वसंत लोढा, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड. अभय आगरकर, भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्षा सुरेखा विद्ये, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक गणेश कवडे, अर्जुन दातरंगे, सुनिल त्रिपाठी, एल.जी.गायकवाड, गौतम दीक्षित, सचिन पारखी, मिलिंद गंधे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

आघाडीमुळे मंजूर वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालय रखडले
शहरात वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर असून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ते होऊ दिले नाही. त्यामुळे नगर शहरातील तरुणांना शिक्षणासाठी पुण्याला जावे लागते, तसेच ३० वर्षांत सारसनगरला दोन लोकप्रतिनिधी असूनही या भागात पाणी, कचरा, विज हे प्राथमिक विकासाचे प्रश्न प्रलंबित असल्याची टीका ही त्यांनी यावेळी बोलताना केली.

विधानसभेवर भगवा फडकवा
याप्रसंगी भगवान फुलसौंदर यांनी विधानसभेवर भगवा फडकविण्यासाठी आणि नगरच्या खुंटलेल्या विकासाला चालना देण्यासाठी महायुतीचे उमेदवार अनिल राठोड यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. या प्रचारफेरीस परिसरातील नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Visit : policenama.com
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like