राजकारणात मुल्य व सिध्दांताची जपणूक करणार्‍या भाजपाला साथ द्या – योगी आदित्यनाथ

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन – राजकारणात परमार्थ मुल्य विचार व सिध्दांताची जपणूक करणार्‍या भाजपाला साथ द्या असे आवाहन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मावळवासीयांना केले.

मावळ विधानसभेचे भाजपा, शिवसेना, रिपाई महायुतीचे उमेदवार बाळा भेगडे यांच्या प्रचाराकरिता लोणावळा शहरात आयोजित सभेत योगी आदित्यनाथ यांनी मावळवासीयांना मार्गदर्शन करताना स्वार्थी राजकारणावर टिका केली.

यावेळी राज्यमंत्री बाळा भेगडे, रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत वाघमारे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, शिवसेना मावळ तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, प्रचारप्रमुख रविंद्र भेगडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, लोणावळा शहराध्यक्ष श्रीधर पुजारी, शिवसेना शहराध्यक्ष सुनिल इंगूळकर, रिप‍ाईच्या महिलाध्यक्षा यमुना साळवे, बिंद्रा गणात्रा, शौकत शेख, भरत हारपुडे, मोतीराम मराठे, देविदास कडू आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना योगी म्हणाले, राजकारण हे स्वार्थाचे नसावे ते परमार्थ, आदर्श, मुल्यावर आधारित असावे. सत्ता राष्ट्राला समर्पित असल्यास विकास कसा होतो हे मागील पाच वर्षात देशाने पाहिले आहे. मागील 70 वर्ष देशाचे विभाजन करणारे काँग्रेस पक्षाने लादलेले कलम 370 मोदी सरकारने रद्द करत देशाला एक भारत श्रेष्ठ भारत बनविले.

महिला सशक्तीकरणाकरिता तिहेरी तलाक विरुध्द कायदा करत मुस्लिम महिलांना सन्मान मिळवून दिला. अन्नदाता शेतकरी सन्मानाकरिता किसान सन्मान योजना, आयुष्यमान भारत योजना, उज्जवला गॅस योजना, स्वच्छतागृह दिले, घरकुल योजना, युवकांना रोजगार दिला, शहिदांच्या कुठुबियांना मोठा आर्थिक आधार दिला, देशाचा व महाराष्ट्राचा विकास करण्याकरिता मोठ्या प्रमाणात रस्त्यांचा विकास केला, नविन कारखानदारी आणली. शेवटी जो विकास करणार त्याला जनता साथ देणार हा सिध्दांत आहे. बाळा भेगडे यांनी 1400 कोटी रुपयांचा निधी आणत मावळात विकास केला. त्यांची योग्यता व क्षमता पाहून त्यांना भाजपाने पुन्हा संधी दिली आहे. भेगडे यांनी मावळ तालुक्याला विकासाच्या वेगळ्या उंचीवर नेले आहे.

राजकारण करताना विचारधारा नसली तर असे स्वार्थी राजकारण समाजाचे व राष्ट्राचे नुकसान करते. सिध्दांतहिन राजकारण म्हणजे मृत्युचा फंदा असल्याने संधीसाधू मंडळींना सत्तेपासून दूर ठेवा. शिवसेना व भाजपा यांची मुल्यनिती एक असल्याने हे दोन्ही पक्ष युतीच्या माध्यमातून एकत्र राजकारण करतात. ह्या निवडणुकीत देखिल ह्या मुल्यांची जपणूक केली जाणार आहे. भाजपा शिवसेना रिपाईच्या सरकारने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्टाचारी राजकारणाला आळा घालण्याचे काम केले आहे. पाच वर्षापुर्वी देशात व राज्यात आतंकवाद व दहशतवाद माजला होता, आज पाच वर्षानंतर देशात व राज्यात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असल्याचे सांगितले.

राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी मनोगतात मावळात केलेल्या विकासकामांचा पाढा वाचून दाखवत काय विकास केला म्हणणार्‍यांनी समोर येऊन बसावे असे आवाहन विरोधकांना केले. मावळ तालुक्यात मोठ्या संख्येने नागरिक योगी आदित्यनाथ यांच्या सभेला उपस्थित होते.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी