कलम ३७० हटविण्यास ‘पाठिंबा’ तर, केंद्रशासित प्रदेश करण्यास ‘विरोध’ : माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरसंबंधीचे कलम ३७० बाबत कधी ना कधी निर्णय घेतलाच पाहिजे होता. हा आपल्या देशांतर्गत प्रश्न आहे, हे जगाला ठणकावून सांगितले पाहिजे, अशा शब्दात कलम ३७० हटविण्यास माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांनी पाठिंबा दिला. त्याचवेळी जम्मू काश्मीरचे विभाजन करुन लडाखला स्वतंत्र केंद्र शासित प्रदेश करण्यास त्यांनी विरोध दर्शविला आहे.

याबाबत माधव गोडबोले यांनी सांगितले की, जम्मू काश्मीरला भारतात सामावून घेण्यासाठी त्यावेळी कलम ३७० ची गरज होती. पण आता बदलत्या काळानुसार त्यात वेळोवेळी बदलही करण्यात आले आहे. त्यातील वादग्रस्त मुद्दे हटविण्यास काहीही हरकत नाही. हा आपला देशांतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे त्यावर इतरांना बोलण्याचा काहीही अधिकार नाही. भारताने हा आमचा देशांतर्गत प्रश्न असल्याचे जगाला ठणकावून सांगितले पाहिजे.

त्याचवेळी लडाखला केंद्रशासित प्रदेश करण्यास त्यांनी विरोध केला आहे. जम्मू हा हिंदु बहुभाषिक तर काश्मीर खोरे हे मुस्लिम बहुभाषिक आणि लडाख हे बौद्ध भाषिक आहे. देशात भाषावार प्रदेश करुन त्यातून विकासाऐवजी त्याची कडु फळेच आपल्याला मिळाली. त्यातून देशाच्या एकसंघपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

खरं तर केंद्रशासित प्रदेश करण्याची आता गरजच नाही. पाँडेचरी येथे फ्रेंचाची वसाहत होती म्हणून त्यांची संस्कृती कायम ठेवण्यासाठी त्याला वेगळा दर्जा देण्याची गरज नाही. तसेच दीव दमण यांना केंद्र शासित प्रदेश केले आहे. त्यावेळी जरी त्याची गरज वाटली तरी आता हे प्रदेश केंद्रशासित ठेवण्याऐवजी शेजारच्या राज्यात सामील करुन घेतली पाहिजेत. याशिवाय नव्याने केंद्रशासित प्रदेश तयार करण्याची गरज नाही. त्यातून लडाखमध्ये अलगतेची भावना वाढू शकेल, असे त्यांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like