‘पाक’ मागतय ‘जागतिक’ स्तरावर ‘मदत’, भारताला मात्र न मागता ‘या’ देशांची ‘साथ’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरवरुन भारत आणि पाकिस्तानात कायमच एक छुपे युद्ध सुरु राहिले आहे. आता जम्मू काश्मीरमधून ३७० कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तान चांगलाच पेटला आहे. पाकिस्तानने कलम ३७० च्या निर्णयानंतर आता भारताशी व्यापारी संबंध तोडले आहे. एवढेच नाही तर राजकीय संबंध देखील ताणले आहे. आता हे राजकीय युद्ध वैश्विक झाले आहे आणि पाकिस्तानचे पंतप्रधान सतत या मुद्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर दुसऱ्या देशाच्या मोठ्या नेत्यांशी चर्चा करत आहे. इमरान खान सर्वांकडे मदत मागत असताना आणखी एक मोठ्या देशाने मात्र भारताला साथ दिली आहे.

अनेक देशांकडे मागितली पाकने साथ
पाकिस्तान काश्मीर मुद्याला वैश्विक रंग देण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे पाकिस्तान आता जगातील अनेक नेत्यांशी काश्मीर मुद्यावर साथ मागत आहे. यासाठी इमरान खान सरकार तुर्क आणि मलेशियाशी चर्चा करत आहे. परंतू दोन्ही देशांनी या मुद्यात मध्यस्थी करण्यास नकार दिला आहे. तर ब्रिटन आणि अमेरिकांना देखील या मुद्यावर मध्यस्थी करण्यास नकार कळवला आहे.

कोणत्याही विनंती शिवाय या देशाने दिली भारताला साथ
भारत कोणत्याही देशाकडे या मुद्यावर मदत मागत नाही, परंतू आंतरराष्ट्रीय नेत्यांची साथ भारताला मिळत आहे. सर्वात आधी यूएई आणि श्रीलंकाने काश्मीर मुद्यावर भारताला साथ दिली आहे. तर मालदिवने देखील सरकारच्या ३७० कलम रद्द केल्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. मुस्लिम देश असलेल्या मालदिवने सांगितले की देशाला आपल्या कायद्यात आवश्यक वेळी संशोधन करण्याचा आधिकार आहे.

आरोग्यविषयक वृत्त