सुप्रिया सुळे यांचा पराभव केला की कायमची कीड निघून जाईल ‘या’ मंत्र्याचे खळबळजनक वक्तव्य

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अगामी लोकसभा निवडणुकीसाठी बारामती मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुप्रिया सुळे आणि भाजपकडुन कांचन कुल यांच्यात लढत होत आहे. रविवारी खडकवासला विधानसभा मतदार संघात भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली, ” एकदा का यावेळी सुप्रिया सुळे यांचा निवडणुकीत पराभव केला की कायमची कीड निघून जाईल असा घणाघात यावेळी बोलताना शिवतारे यांनी केला “.

यावेळी बोलताना शिवतारे म्हणाले, ” ही निवडणूक कांचन कुल विरुद्ध सुप्रिया सुळे एवढीच मर्यादित नाही तर गेली ७० वर्षे चालत आलेली पवार कुटुंबीयांची परंपरा मोडीत काढायची आहे. त्यासाठी आता सर्वानी एकत्र येण्याची गरज आहे. एकदा का यावेळी सुप्रिया सुळे यांचा विवडणुकीत पराभव केला की कायमची कीड निघून जाईल असा घणाघात शिवतारे यांनी केला. तसेच यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर देखील टीका केली ते म्हणाले एकेकाळी राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटायचे की आम्हीच राज्यकर्ते आहोत, बाकी सारे ऐरेगैरे आहेत. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. आता सर्वसामान्य मंत्री झाले आहेत आणि या राज्यकर्त्यांना आमच्यासमोर बसावं लागत आहे. हेच त्यांचं मुळ दुखणं आहे. असे शिवतारे म्हणाले.

पवार भावी पंतप्रधान म्हणून मिरवतात

यावेळी बोलताना शिवतारे पुढे म्हणाले, ” गेली ४० वर्षे शारद पवार भावी पंतप्रधान म्हणून मिरवतात मात्र त्यांना अद्याप पंतप्रधान होता आले नाही. पण एका सामान्य घरातून आलेला नेता जेव्हा गुजरातचा विकास करतो आणि ते गुजरात मॉडेल देशासमोर ठेवतो त्यामुळे देशाला देखील वाटत की, हा नेता जर पंतप्रधान झाला तर निश्चितच देशाचा विकास होईल आणि त्यामुळेच नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. पण पवारांना अद्याप पंतप्रधान होता आले नाही.

Loading...
You might also like