#Me Too : माजी केंद्रीयमंत्री एम. जे. अकबर यांना झटका ! प्रिया रमानी ‘निर्दोष’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   माजी केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांनी प्रिया रमानी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. मात्र, राउज ऍव्हेन्यू न्यायालयाने हा दावा फेटाळला. त्यादरम्यान न्यायालयाने सांगितले, की महिलेला तिच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाची तक्रार दशकानंतरही देता येऊ शकते. तसा तिला अधिकारही आहे.

या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने सांगितले, की लैंगिक शोषणाची बळी ठरलेल्या महिलेला दहा वर्षानंतरही तक्रार देण्याचा अधिकार आहे. त्यासह राउज ऍव्हेन्यू न्यायालयाने मानहानीच्या प्रकरणात प्रिया रमानी यांना निर्दोषमुक्त केले. न्यायालयाने सांगितले, की लैंगिक शोषण आत्मसन्मान आणि आत्मविश्वास संपवतो. त्यामुळे महिलांना दशकानंतरही तक्रार करण्याचा अधिकार आहे.

समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीही लैंगिक शोषण करु शकतो. पीडितेला अनेक वर्ष हे समजले नव्हते, की तिच्यासोबत काय होत आहे. महिलेला तिच्या अपराधाबाबत कधीही आणि कुठंही आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे. दशकानंतरही महिला तिच्यावर झालेल्या अत्याचाराविरोधात आवाज उठवू शकतात. महिलेला लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठविल्यानंतर कोणतीही शिक्षा सुनावली जात नाही.

#MeToo दरम्यानही ट्विट

लैंगिक शोषणाविरोधात जेव्हा #MeToo ही मोहिम ट्विटरवर सुरु होती. त्यावेळीही रमानी यांनी अकबर यांच्याविरोधात ट्विट केले होते. त्यानंतर अकबरने रमानी यांच्याविरोधात 15 ऑक्टोबर, 2018 मध्ये एक मानहानीचा दावा दाखल केला होता.

लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठविण्यास नाही कोणतीही मर्यादा

या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने सांगितले, की महिलेला लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठविण्यास कोणतीही कालमर्यादा नाही. तसेच महिला तिच्यावर झालेल्या लैंगिक शोषणावर काही वर्षानंतरही तक्रार दाखल करू शकते.