माजी मुख्यमंत्री फडणवीसांच्या उमेदवारी अर्जासंबंधित ‘सुनावणी’ आता खुल्या न्यायालयात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निवडणूकीचा उमेदवारी अर्ज भरताना त्यात आपल्यावरील दाखल असलेल्या दोन फौजदारी गुन्हांच्या प्रकरणाची माहिती लपवल्याचा आरोप आहे. आता या प्रकरणात त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने देवेंद्र फडणवीस यांची पुनर्विचार याचिकेवर खुल्या न्यायालयात सुनावणीच्या मागणीस मान्यता दिली आहे. यानंतर आता उमेदवारी अर्जासंबंधित प्रकरणाची सुनावणी खुल्या न्यायालयात होईल. यासंबंधित मागणी फडणवीस यांच्याकडून करण्यात आली होती.

सर्वोच्च न्यायालयाने फडणवीस यांच्या 2014 च्या निवडणूकीच्या उमेदवारी अर्जात दोन गुन्हांची माहिती लपवल्या प्रकरणी नागपूरच्या न्यायालयाला सुनावणी पुन्हा सुरु करण्याचे आदेश दिले होते. परंतु आता न्यायालय फडणवीस यांची पुनर्विचार याचिका खुल्या न्यायालयात सुनावणी करण्यास तयार झाले आहे.

मागील वर्षी फडणवीस यांना नागपूर पोलिसांनी समन्स देखील पाठवला होता. माहितीनुसार हे प्रकरण तेव्हा पुढे आले जेव्हा महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वातील महाविकासआघाडीचे सरकार आले. फडणवीस नागपूरचे आमदार आहेत.

मॅजिस्ट्रेट न्यायालयाने 1 नोव्हेंबरला एका अर्जावर सुनावणी केली होती, ज्यात कथित रुपात खुलासा न करण्यासाठी भाजप नेत्यांच्या विरोधात फौजदारी कारवाईची मागणी केली गेली होती. वकील सतीश उके यांनी न्यायालयात एक अर्ज दाखल करुन मागणी केली होती की फडणवीसांच्या विरोधात फौजदारी करवाई सुरु केली जावी.

मुंबई उच्च न्यायालयाने खालच्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशावर उके यांची याचिका रद्दबातल ठरवली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑक्टोबरला मॅजिस्ट्रेट न्यायालयाने उके यांच्या द्वारे दाखल अर्जाबरोबर पुढे जाण्याचे निर्देश दिले. 4 नोव्हेंबरला मॅजिस्ट्रेट न्यायालयाने सांगितले की या प्रकरणाला फौजदारी प्रकरण म्हणून पाहिले जाईल आणि नोटीस जारी केली जाईल.

मॅजिस्ट्रेट एस. डी. मेहता म्हणाले की, आरोपीच्या (फडणवीस) विरोधात जनप्रतिनिधित्व अधिनियम, 1951 ची धारा 125 ए अंतर्गत गुन्ह्यासाठी दंडात्मक कारवाई जारी करण्यात आली आहे. 1996 आणि 1994 मध्ये फडणवीस यांच्या विरोधात फसवणूक प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. परंतू दोन प्रकरणात आरोप निश्चित नाहीत. उके यांनी आरोप लावला आहे की फडणवीस आपल्या निवडणूकीच्या उमेदवारी अर्जात माहितीचा खुलासा केला नाही.

फेसबुक पेज लाईक करा –