हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात धनंजय मुंडेची सर्वोच्च न्यायालयात धाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. धनंजय मुंडे यांनी पदाचा गैरवापर करून त्यांच्या जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी विकत घेतली असा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी राजाभाऊ फड यांनी याचिका दाखल केली होती. या निर्णयाविरोधात धनंजय मुंडे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका मुंडे यांनी दाखल केली आहे. या याचिकेवर उद्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

राजकीय सूडबुध्दीतून माझ्याविरुद्ध तक्रार : धनंजय मुंडे

धनंजय मुंडे यांनी जमीन हडपल्याचा इन्कार केला आहे. शेतकरी व बँकांचे ५४०० कोटी रूपयांना बुडवणार्‍या रत्नाकर गुट्टे यांचे प्रकरण मी उचलून धरल्यामुळे त्यांचे जावाई असलेल्या राजाभाऊ फड यांच्या कडून राजकीय सुडबुध्दीने कोर्टाची दिशाभूल करून आपल्या विरूध्द खोटे आदेश न्यायालयाकडून प्राप्त करून घेतले असल्याचे स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिले आहे.

काय आहे प्रकरण –

सरकारी जमीन बेलखंडी मठाला इनाम दिली होती. कुठल्याही इनामी जमिनीचा खरेदी व्यवहार होत नाही. मात्र हीच जमीन धनंजय मुंडे यांनी पदाचा गैरवापर करून, दबाब टाकून त्यांच्या जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी विकत घेतली. कृषी जमीनही अकृषिक केली असं याचिकेत म्हटलं आहे. याप्रकरणी राजाभाऊ फड यांनी बर्दापूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. मात्र यामध्ये कुठलीही पावले उचलली नाहीत. त्यामुळे रजाभाऊ फड यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने धनंजय मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

आरोग्य विषयक वृत्त –

भात खाल्ल्याने वजन वाढते; खरं आहे का ?

घातक ! दूधासोबत चुकनूही खाऊ नका ‘हे’ ९ पदार्थ

गूळ-फुटाणे स्नायूंच्या मजबुतीसाठी आहेत फायदेशीर

डँड्रफ मुळापासून नष्ट करा; शॅम्पूमध्ये हे मिसळा

You might also like