दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागा : सुप्रीम कोर्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणाचा तपास सुरु असतानाच दुसरीकडे त्याच्या मॅनेजरच्या मृत्यूबद्दलही अपडेट्स येत आहेत. दिशा सालिया (Disha Salian) च्या मृत्यूबाबत सोमवारी (दि. 26) सुप्रीम कोर्टामध्ये (supreme-court) सुनावणी झाली. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना मुंबई हायकोर्टात (Bombay High court) जाण्याचे आदेश दिले आहेत. याचिकाकर्त्यांनी दिशाच्या मृत्यूचा तपास सीबीआय (CBI) कडे सोपवावा, अशी मागणी केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर याचिकाकर्ते काय पाऊल उचलणार हे पाहण महत्वाच असणार आहे.

दिशाच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे द्यावा, यासाठी पुनीत ढाका – कौर यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाच्या काही दिवसांपूर्वी दिशाने हिने आत्महत्या केली. 8 जून 2020 रोजी दिशाच्या घरात पार्टी झाली होती. या पार्टीला तिचा बॉयफ्रेंड रोहन रॉय आणि इतर 6 जण उपस्थित होते. पार्टीनंतर दिशाने 14 व्या मजल्यावरुन उडी मारुन तिचं जीवन संपवले होते. दिशावर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. दिशाच्या मृत्यूचे गूढ उलगडल जाणार का याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.