सुप्रीम कोर्ट : जजने केला पीडितेला प्रश्न – अखेर रात्री 8 वाजता हॉटेलच्या खोलीत भेटण्यासाठी का गेली ?

नवी दिल्ली : वृत्त संस्था – सुप्रीम कोर्टा (supreme court) ने दुष्कृत्यातील आरोपी लष्कराच्या एका जवानाला हे म्हणत अटकेपासून दिलासा दिला की अखेर पीडित तरूणी रात्री आठ वाजता आरोपीला भेटण्यासाठी हॉटेलच्या खोलीत का गेली ? हा जवान सध्या जम्मू काश्मीरमध्ये तैनात आहे.

जस्टिस विनीत शरण आणि जस्टिस बीआर गवई यांच्या पीठाला आरोपी जवानाद्वारे दाखल अटकपूर्व जामीन याचिकेवर सुनावणी करताना आढळले की, आरोपी आणि तक्रारदार तरूणीमध्ये अगोदरपासून संबंध होते. पीठाने पीडितेच्या वकिलाला प्रश्न विचारला की रात्री आठ वाजता तरूणी आरोपीला भेटण्यासाठी हॉटेलच्या खोलीत का गेली ?

यावर वकीलाने म्हटले तरूणी आणि आरोपी अगोदरपासून एकमेकांच्या ओळखीचे होते. वकीलांनी दावा केला की, हॉटलेमध्ये चहामध्ये गुंगीचे औषध मिसळून तिला पाजण्यात आले आणि यानंतर दुष्कृत्य केले. आरोपीच्या अटकपूर्व जामीनाला विरोध करत हे सुद्धा म्हटले की, त्याने लग्नाचे अमिष दाखवून तरूणीशी संबंध ठेवले.

जवानाचे वकील सुमित सिन्हा यांनी म्हटले की, याचिकाकर्ता आणि पीडितेमधील संबंधी, दोघांनी आपल्या मर्जीने ठेवले होते. दोघे एकमेकांना 2017 पासून ओळखत होते. याचिकाकर्त्याचे म्हणणे होते की, त्यांच्या नात्यात तेव्हा कटुता आली जेव्हा मुलीचे आई-वडील विवाहासाठी भेटले होते.

यानंतर तक्रारदाराने एफआयआर नोंदवून त्याच्यावर दुष्कर्माचा आरोप केला. याचिकाकर्त्याचे वकील सिन्हा यांनी म्हटले की, या प्रकरणात चार्जशीट दाखल होईपर्यंत तो जामीनावर होता आणि आता ट्रायल सुरू झाली आहे यासाठी त्यास न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात काहीच अर्थ नाही.

आग्रामध्ये दाखल प्रकरणात आरोपीला दिलासा
सुप्रीम कोर्टाने प्रकरण जाणून घेतल्यानंतर आग्राच्या एका पोलीस ठाण्यात दाखल या प्रकरणात जवानाला अटकेपासून दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जामीनाच्या याचिकेवर नोटीस जारी करत युपी सरकार आणि तक्रारदार तरूणीला नोटीस जारी करून सहा आठवड्यात उत्तर देण्यास सांगितले आहे.

यापूर्वी अलाहाबाद हायकोर्टाने आरोपी जवानाला तीन महिन्यासाठी दिलासा देत म्हटले की, अटकेचा दिलासा तीन महिन्यानंतर वाढवला जाणार नाही. हायकोर्टाच्या या आदेशाला जवानाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे.

Also Read this : 

…म्हणून मुंबईच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करणार्‍या तरूणानं लावला गळफास, रूमच्या भिंतीवर लिहिलं आत्महत्येचं कारण

महाराष्ट्राच्या चिंतेत वाढ ! तिसऱ्या लाटेपूर्वीच मे महिन्यात 34 हजारांवर मुलं ‘कोरोना’च्या विळख्यात

Pune : सिंहगड रोड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात माजी महासंचालक मारूती सावंतांचा जामीन न्यायालयाने फेटाळला

Lockdown च्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण, म्हणाले – ‘कोरोना रुग्णांचे आकडे कमी होत असले तरी लगेचच सर्व काही उघडणार नाही’