सर्वोच्च न्यायालयाचे CBSE अन् ICSE बोर्डाला स्पष्ट आदेश, म्हणाले – ’12 वीच्या निकालासाठीचे निकष 2 आठवड्यात सांगा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात उद्भवलेल्या कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई CBSE बोर्डाची 12 वीची परीक्षा रद्द करण्याच्या केंद्राच्या निर्णायाचे सर्वोच्च न्यायालयाने स्वागत केले आहे. पण यापुढील नियोजन तातडीने करा, असा सल्ला न्यायालयाने दिला आहे. 12 वीच्या  विद्यार्थ्यांचा निकाल नेमका कसा लावणार? त्यासाठीचे निकष कोणते? याची माहिती येत्या 2 आठवड्यांत सादर करा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने सीबीएसई CBSE अन् आयसीएसई ICSE बोर्डाला दिले आहेत.

कोर्टात 12 वीच्या परीक्षा रद्द करण्यासंबंधी अ‌ॅड. ममता शर्मा यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी देशातील आणि परदेशातील अभ्यासक्रमांचे प्रवेश महच्वाचे आहेत. तुम्ही तातडीने निर्णय घ्या. गरज पडल्यास दररोज ऑनलाईन मिटिंग घ्या पण 2 आठवड्यामध्ये निर्णय जाहीर करा, असे न्यायालयाने बजावले आहे.

‘उद्या इज्जत घालवण्यापेक्षा आजच राजीनामा देऊन टाका’

सीबीएसईच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णायाबाबत अ‌ॅड. ममता शर्मा यांनी याचिका दाखल केली आहे. ही याचिका रद्द करण्याची मागणी केंद्राकडून अ‌ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी केली. त्यावर सुप्रीम कोर्टाने आधी 12 वीचा निकाल कसा अन् कोणत्या निकषांवर लावणार हे निश्चित करा. त्याची माहिती कोर्टाला सादर करा, असे केंद्राला सांगितले आहे. आयसीएसईच्या ICSE वकिलांनी यासाठी 4 आठवड्यांची वेळ मागितली. पण न्यायालयाने केंद्राची अन् आयसीएसईची बाजू ऐकून घेत अखेर 2 आठवड्यांची मुदत दिली आहे. तुमची इच्छा असेल तर हे एका रात्रीत करु शकता. मात्र दोन आठवड्यामध्ये निकालाचे निकष जाहीर करा. वेळ वाढवून देण्यासाठी युक्तिवाद करु नका, असे न्यायाधीशानी रोखठोक भूमिका घेत सांगितले आहे.

READ ALSO THIS :

50 हजाराची लाच घेताना उत्पादन शुल्कचा निरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Covid-19 Vaccine : कोविड व्हॅक्सीन घेतल्यानंतर ‘ही’ 7 कामं अजिबात करू नका, ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; जाणून घ्या

मुंबईत प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, किचनमध्ये पुरलेल्या मृतदेहाचे रहस्य 6 वर्षाच्या मुलीने सांगितले

Photos : 133 किलो होते वजन, आयपीएस अधिकाऱ्यानं 9 महिन्यात कमी केलं 43 किलो वजन, वायरल झाली छायाचित्रे

तुषार कपूरने लग्न का केलं नाही?, म्हणाला…