कार आणि बाईक खरेदी करणार्‍यांनी रहावं ‘अलर्ट’ ? 31 मार्चनंतर बदलणार नियम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही कार किंवा बाइक खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा सांगितले की 31 मार्च 2020 नंतर BS – 4 वाहनांची विक्री करता येणार नाही. शुक्रवारी न्यायालयाने ऑटोमोबइल डीलर्सची याचिका रद्दबातल ठरवली.

त्यामुळे वाहन खरेदी करणार असाल तर वाहनाच्या BS  नंबर बाबत जागृक रहा. तसेच जर कोणी सेकेंड हॅंड गाडी खरेदी करत असेल तरी त्यांनी देखील बीएस इंजिन बाबतची माहिती घ्यावी. अन्यथा वाहनाचे इंजिन BS – 4 मधून BS – 6 मध्ये अपग्रेड करावे लागू शकते. या अपग्रेडेशनसाठी 10 ते 20 हजार रुपयांची खर्च येण्याची शक्यता आहे.

काय आहे BS वाहन मुद्दा –
जेव्हा वाहन खरेदी होते तेव्हा त्या गाडीच्या बीएसची चर्चा होते. बीएस म्हणजे भारत स्टेज. हे असे मानक आहे जे भारत वाहनामुळे होणारे वायू प्रदूषण मापण्यासाठी वापरले जाते.
हे मानक भारताने निश्चित केले आहे. बीएसपुढे 3, 4, 5, 6 असे स्टेज लावण्याची पद्धत आहे. ज्यामुळे त्या वाहनांच्या इंजिनची मानकता तपासता येते. यावरुन कळते की वाहन पर्यावरणसाठी घातक आहे की सुरक्षित.

सोप्या शब्दात बीएसपुढे जितका मोठा आकडा लागेल त्यानुसार त्यातून होणाऱ्या प्रदुषणाची संभावना कमी होते. पुढील 1 एप्रिलपासून बीएस – 6 वाहन अनिवार्य केले आहेत. या मानकाच्या गाड्याद्वारे प्रदूषण कमी होते. हे लक्षात घेऊन आता ऑटो कंपन्या बीएस – 6 वाहनं लॉन्च करतील.

या दरम्यान ऑटो कंपन्या BS – 4 वाहनांचा स्टॉक कमी करण्यासाठी बंपर डिस्काउंट आणि ऑफर्स देतील. परंतु अशी बीएस – 4 वाहन खरेदी करायची की नाही याबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम आहे.