मनोरंजक दृश्य ! ‘मॉर्निंग वॉक’ला निघाले होते CJI एसए बोबडे, ‘हार्ले डेविडसन’ पाहून बनले ‘बाइकर’

नागपुर : पोलीसनामा ऑनलाइन – देशाचे सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे यांचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. नेहमी काळा कोट परिधान करून सुप्रीम कोर्टात सर्वोच्च पदावर बसणारे सीजेआय एसए बोबडे ट्रॅक पँट आणि टी-शर्टमध्ये हार्ले डेविडसनच्या शानदार बाइकवर बसलेले दिसत आहेत.

कोरोना महामारीमध्ये सीजेआय सध्या नागपुरमधील आपल्या घरातूनच सुप्रीम कोर्टात येणार्‍या महत्वपूर्ण प्रकरणांवर सुनावणी करत आहेत. रविवारी सकाळी जेव्हा ते वॉकवर निघाले, तेव्हा त्यांची नजर हार्ले डेविडसन बाइकवर पडली. मग का, त्यांनी बाईकच्या हँडलचाच ताबा घेतला. यादरम्यान तेथे उपस्थित लोकांनी त्यांचे फोटो काढले, जे सोशल मीडियावर खुप वायरल होत आहेत.

देशात कोरोना वायरसची प्रकरणे लागोपाठ वाढत आहेत. अशावेळी सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे जरूरी आहे. फोटोत दिसत असलेल्या सर्व लोकांनी मास्क लावलेला आहे. मात्र, सीजेआय एसए बोबडे बहुतेक मास्क घालायचे विसरून गेल्याचे दिसते आहेत. काही लोक यावरदेखील प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत.

जस्टिस बोबडे यांना फोटोग्राफी आणि पुस्तकं वाचनाचा छंद आहे. तसेच त्यांना बाईक रायडिंगची देखील हौस आहे. जस्टिस एसए बोबडे यांचे वडील प्रसिद्ध वकिल होते. याच कारणामुळे वडिलांप्रमाणे जस्टिस बोबडे यांनाही पुस्तके वाचण्याची आवड आहे. त्यांनी नागपुर युनिव्हर्सिटीत आर्टस अ‍ॅण्ड लॉमध्ये ग्रॅज्युएशन केले आहे.

 

जस्टिस शरद अरविंद बोबडे सुप्रीम कोर्टाचे 47वे सीजेआय आहेत. त्यांनी माजी सीजेआय जस्टिस रंजन गोगोई यांच्यानंतर 18 नोव्हेंबर 2019 ला पदभार सांभाळला. चीफ जस्टिस म्हणून बोबडे यांचा कार्यकाळ सुमारे 17 महिन्यांचा आहे. ते 23 एप्रिल 2021 ला निवृत्त होतील.

 

जस्टिस एस. ए. बोबडे यांचे आपल्या आईसोबत खुप सुंदर नाते आहे. देशाचे सरन्यायाधीश बनल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी घरी जाऊन आईचे पाय धरले होते. त्यांची आई दिर्घकाळापासून आजारी आहे, आणि ती बोलू शकत नाही.

सध्या भारतात हार्ले-डेविडसनच्या एकुण 16 बाइक विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सर्वात कमी किमतीचे मॉडल हार्ले-डेविडसन स्ट्रीट 750 आहे, ज्याची किमत 5,34,000 रुपये आहे. तर, सर्वात महाग मॉडलमध्ये हार्ले-डेविडसन सीव्हीओ लिमिटेडचे नाव येते, किमत 50,53,000 रुपये आहे.