Coronavirus : देशात ऑक्सिजन पुरवठा लवकरच होणार सुरळीत ! सर्वोच्च न्यायालयाने केली नॅशनल टास्क फोर्सची स्थापना; महाराष्ट्रातून डॉ. राहूल पंडित यांची निवड

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन : देशभरात कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. रुग्णसंख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. आवश्यक त्या आरोग्य सेवा-सुविधा मिळत नसल्याने अनेक रुग्णही दगावत आहेत. पण आता सर्वोच्च न्यायालयाने याकडे विशेष लक्ष दिले आहे. त्यानुसार, ऑक्सिजन पुरवठ्यासाठी नॅशनल टास्क फोर्सची स्थापना केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेला टास्क फोर्स देशात वैद्यकीय ऑक्सिजनची गरज, उपलब्धता आणि वितरण याबाबतचे मूल्यांकन करण्याचे काम करणार आहे. तसेच या टास्क फोर्सचे काम सध्याच्या परिस्थितीत आवश्यक असलेल्या वैद्यकीय साधनांची गरज जाणून त्यावर योग्य पावले उचलणे हे आहे.

कोण आहेत या टास्क फोर्समध्ये…

– डॉ. भबतोष विश्वास, माजी कुलपती, पश्चिम बंगाल आरोग्य विज्ञान विश्वविद्यालय, कोलकाता

– डॉ. देवेंद्र सिंह राणा, अध्यक्ष, प्रबंधन बोर्ड, सर गंगा राम रुग्णालय, दिल्ली

– डॉ. देवी प्रसाद शेट्टी, अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक, नारायण हेल्थकेयर, बंगलुरु

– डॉ. गगनदीप कांग, प्रोफेसर, ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, वेल्लोर, तमिलनाडू

– डॉ. जेवी पीटर, संचालक, ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, वेल्लोर, तमिलनाडु

– डॉ. नरेश त्रेहान, अध्यक्ष आणि प्रबंध निदेशक, मेदांता रुग्णालय आणि हृदय संस्थान, गुरुग्राम

– डॉ. राहुल पंडित, संचालक, क्रिटिकल केयर मेडिसिन आणि आईसीयू, फोर्टिस रुग्णालय, मुलुंड (मुंबई, महाराष्ट्र) आणि कल्याण (महाराष्ट्र);

– डॉ. सौमित्र रावत, अध्यक्ष आणि प्रमुख, सर्जिकल गॅस्ट्रोएंटरोलॉजी आणि लिव्हर प्रत्यारोपण विभाग, सर गंगा राम रुग्णालय

– डॉ. शिव कुमार सरीन, वरिष्ठ प्रोफेसर आणि हेपेटोलॉजी विभागाचे संचालक

– डॉ. जरीर एफ उदवाडिया, कंसल्टेंट चेस्ट फिजिशियन, हिंदुजा हॉस्पिटल, ब्रीच कँडी हॉस्पिटल आणि पारसी हॉस्पिटल, मुंबई

– सचिव, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार (पदेन सदस्य)

– नॅशनल टास्क फोर्सचे संयोजक.

दरम्यान, यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्राच्या पुढच्या आदेशापर्यंत दिल्लीला कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी दररोज 700 मेट्रिक टन ऑक्सिजन देण्याचे सांगितले होते.