प्राध्यापक आनंद तेलतुंबडें विरोधातील गुन्हा रद्द करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

पुणे – पोलिसनामा ऑनलाईन – कोरेगाव भीमा हिंसाचार त्याचबरोबर नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून देखील दिलासा मिळू शकलेला नाही. त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्या संदर्भात असणारी तेलतुंबडे यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने देखील गुन्हा रद्द करण्यास नकार दिला होता.

शहरी नक्षलवादाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा रद्द दाखल केला होता. हा गुन्हा रद्द करण्‍यासाठी तेलतुंबडे यांनी सुप्रीम कोर्टात विशेष याचिका दाखल केली होती. यावर सोमवारी सुनावणी झाली. गुन्हाचे स्वरूप गंभीर असून त्याची व्याप्ती मोठी असल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदवले आहे. तपासात आणखी माहिती समोर असल्याने या घडीला गुन्हा रद्द करणे योग्य ठरणार नाही. असा दावा पोलिसांनी कोर्टात मांडला. आपल्याला या प्रकरणात अडकविन्यात आले असल्याचे सांगत तेलतुंबडे यांनी आपल्याविरोधातील सर्व आरोपांचे खंडण केले आहे. मात्र, पोलिसांनी त्यांच्याकडे तेलतुंबडेंविरोधात अनेक पुरावे असल्याचा देखील दावा केला आहे.

असे आरोपपत्र केले होते दाखल …. 
भीमा-कोरेगाव प्रकरणात पुणे पोलिसांनी एकूण 10 आरोपींविरोधात बेकायदा कृत्ये प्रतिबंध कायद्यांतर्गत 5160 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्र दाखल झालेल्या 10 आरोपींपैकी सुधीर ढवळे, रोना विल्सन, सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन आणि महेश राऊत यांना सहा जून रोजीच अटक करण्यात आली होती. उर्वरित प्रा. वरवरा राव, सुधा भारद्वाज, अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलखा यांना 28 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. बंदी असलेल्यांचा  माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपांवरून त्यांना छापेमारी करत अटक करण्यात आली होती.
You might also like