कोरेगांव भीमा प्रकरण : महाराष्ट्र पोलिसांना मोठा धक्का; ‘त्या’ पाच जणांना नजरकैदेत ठेवण्याचे सुप्रिम कोर्टाचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

कोरेगाव-भीमा दंगलप्रकरणी एल्गार परिषदेवर ठपका ठेवण्यात आला होता. यासंदर्भात तपासामध्ये परिषदेशी संबंधित कार्यकर्त्यांचे व बंदी घातलेल्या माओवादी संघटनेचे लागेबांधे असल्याचे पोलिसांना आढळले होते. बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी संबंध असलेच्या संशयावरुन मंगळवारी देशभरातील नऊ ठिकाणी घातलेल्या छाप्यात पाच जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना नजर कैदेत ठेवण्याचे आदेश आज सुप्रीम कोर्टाने पोलिसांना दिले आहे. याप्रकरणी महाराष्ट्र सरकारला मंगळवार पर्य़ंत उत्तर देण्याचेही आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
[amazon_link asins=’B07417987C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bbfa83f9-ab84-11e8-826d-b340b16409bf’]

अटक केलेल्यांमध्ये देशातील नामवंत कार्यकर्ते, समाजसेवक यांचा समावेश आहे. यात सुधा भारद्वाज, गौतम नवलाखा, वेरनोन गोन्सालविस,अरुण पाररिया, वरावर राव यांचा समावेश आहे. या सर्वांना ५ सप्टेंबरपर्यंत नजरकैदेत ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणात पुणे पोलिसांना उत्तर देण्यासाठी मंगळवार पर्य़ंतची मुदत सुप्रीम कोर्टाने दिली आहे.

सुप्रिया सुळे यांचे पुन्हा एकदा ‘सेल्फी विथ खड्डा’ आंदोलन

तसेच महाराष्ट्र सरकारला यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्यासही सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. यासंदर्भात न्यायालयानं फडणवीस सरकारनं नोटीसही बजावली आहे. या पाचही आरोपींना 5 सप्टेंबरपर्यंत नजरकैदेत ठेवण्यात येणार असून, पुढील सुनावणी 6 सप्टेंबरला होणार आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ते सुधा भारद्वाज यांच्या ट्रान्झिट रिमांडलाही सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे.

तसेच बंदी असलेल्या माओवादी संघटनांशी या कार्यकत्यांचा संबंध असल्याचे निष्पन्न झाल्याने मंगळवारी पुणे पोलिसांनी कवी वरावरा राव (हैदराबाद), इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकलीचे संपादकीय सल्लागार गौतम नवलाखा (दिल्ली), मानवी हक्क कार्यकर्त्या सुधा भारद्वाज (फरिदाबाद) व वेरनोन गोन्साल्विस (मुंबई) अरुण फरेरा (ठाणे) यांना अटक केली.
[amazon_link asins=’B01BKEZYBY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d6f6a090-ab84-11e8-9064-77fda4503979′]

फरिदाबाद येथील सत्र न्यायालयातून सुधा भारद्वाज यांना हजर करण्यात आले. त्यांना पुणे न्यायालयात हजर करण्यासाठी ट्रान्झिट रिमांड मागण्यात आला. न्यायालयाने तो मंजूर केला. पुणे पोलिसांचे पथक त्यांना पुण्याला घेऊन जाण्याची तयारी करत असतानाच भारद्वाज यांचे नातेवाईक उच्च न्यायालयात गेले. त्यांनी तातडीने हेबियस कॉर्प्स याचिका दाखल केली.

पुणे पाेलिसांनी अटक केलेल्या  ‘त्या’ पाच जणांबाबत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून राज्य सरकारला नोटीस