FADA ला झटका ! BS IV वाहनांच्या विक्रीसाठी 1 दिवसाची देखील मुदतवाढ मिळणार नाही, सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फेडरेशन ऑफ ऑटो मोबाइल डीलर्स असोसिएशनने (FADA) न्यायालयात BS – IV वाहनांची विक्री करण्यासाठी 1 एप्रिलच्या पुढे मुदतवाढ करण्याची याचिका दाखल केली होती परंतु सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी ही याचिका फेटाळून लावली. असोसिएशनने याचिकेत म्हणले होते की BS – IV इंजिन असलेल्या वाहनांच्या विक्रीची मर्यादा आणखी 1 महिना वाढवण्यात यावी. परंतु या प्रकरणीची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीश अरुण मिश्रा आणि न्यायाधीश दीपक गुप्ता यांनी सांगितले की BS-IV वाहनांच्या विक्रीची मुदत आणखी 1 दिवस देखील वाढवण्यात येणार नाही.

दीड वर्षांपूर्वी देण्यात आला होता प्रतिबंध आणण्याचा निर्णय –
केंद्र सरकारने 2016 मध्ये घोषणा केली होती की 1 एप्रिल 2020 नंतर भारतात BS-V इंजिनची वाहनांऐवजी थेट BS-VI इंजिनाची वाहने आणावीत. सर्वोच्च न्यायालयाने 24 ऑक्टोबर 2018 सालीच सांगितले होते की 1 एप्रिल 2020 नंतर देशात BS-IV इंजिनच्या वाहनांची ना की विक्री होईल ना की त्यांची नोंदणी करण्यात येईल.

न्यायालयात असोसिएशनचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कौन्सिलने सांगितले की डीलर्सकडे BS-IV वाहनांची संख्या जास्त आहे, जे निश्चित वेळेत विकणे अवघड आहे. वकील म्हणाले की सध्या वाहन निर्मिती कंपन्या मंदीतून जात आहेत. अशा परिस्थितीत मुदत कालावधी वाढण्यात आला तर सध्याची वाहने विकता येतील.

न्यायालयाने दिला स्पष्ट नकार –
असोसिएशनचे ऐकून घेतल्यावर न्यायालयाच्या दोन्ही न्यायाधीशांच्या पीठाने सांगितले की आदेश दीड वर्षांपूर्वी पारित करण्यात आला होता. न्यायालयाने स्पष्ट केले की न्यायालयाच्या आदेशानंतर निर्मात्यांनी या वाहनांची निर्मिती पूर्णता बंद केली पाहिजे होते, असे असताना देखील वाहन निर्मिती झाली.

प्रदूषणाची परिस्थिती चिंताजनक –
ऑक्टोबर 2018 मध्ये देण्यात आलेल्या आदेशातच न्यायालयाकडून सांगण्यात आले होते की ही मर्यादा पुढे वाढवणे म्हणजे परिस्थिती आणखी खराब होणार आणि त्याचा परिणाम सामान्य लोकांवर होणार. प्रदुषणांची स्थिती आधीच चिंताजनक आहे. यानंतर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की ही याचिका रद्दबातल ठरवली जात आहे आणि 1 दिवसांची देखील मुदतवाढ देण्यात येणार नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like