निर्भया गँगरेप केस : पवन गुप्ता घटनेवळी अल्पवयीन, सुप्रीम कोर्टानं याचिका फेटाळली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया प्रकरणातील फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या चार दोषींपैकी एक पवन गुप्ता याच्याकडून घटनेवेळी आपण अल्पवयीन असल्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आली आहे.

पवन गुप्ता याने याचिकेत दावा केला होती की, 16 डिसेंबर 2012 ला अल्पवयीन होता. यामुळे त्याची फाशीची शिक्षा रद्द करण्यात यावी. न्यायाधीश आर. भानुमति यांच्या अध्यक्षतेत 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळत सवाल केला की, ही बाब किती वेळा मांडणार ? अल्पवयीन असल्याची बाब ट्रायल कोर्टमध्ये का सांगण्यात आली नाही ? आता पवन गुप्ताकडे क्युरेटिव्ह याचिका आणि राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल करण्याचा पर्याय शिल्लक आहे.

दोषीकडून शाळेचे प्रमाणपत्र न्यायलायात सादर –
पवन गुप्ताचे वकील एपी. सिंह यांनी न्यायालयात गायत्री बाल स्कूल या शाळेचे प्रमाणपत्र मांडले आहे. वकील म्हणाले की हे दस्तावेज नवे आहे. यात दोषी पवनची जन्मतारीख 8 ऑक्टोबर 1996 आहे. आमच्याकडे हा दस्तावेज आहे. पवन गुन्ह्यावेळी अल्पवयीन होता. यावर खंडपीठाकडून सवाल करण्यात आला की, तुम्ही ट्रायल कोर्ट, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात हा मुद्दा तुम्ही उचलला आहे, किती वेळी तुम्ही हा मुद्दा उपस्थित करणार ?

न्यायाधीश अशोक भूषण आणि न्यायाधीश बोपन्ना यांनी पवनचे वकील एपी. सिंह यांना विचारले की 9 जुलै 2018 ला तुमची (पवन) याचिका रद्दबातल ठरवली होती, परंतु आता तुम्ही नव्या माहितीसह न्यायालयात कसे आलात ?

उच्च न्यायालयाने पहिल्यांदाच फेटाळली याचिका –
दोषी पवन गुप्ता याची याचिका यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने दोषी पवनला अल्पवयीन सांगणारी याचिका फेटाळत पवनचे वकील एपी. सिंह यांना 25 हजार रुपयांचा दंड न्यायालयाने ठोठावला होता.

निर्भया प्रकरणातील आणखी एक आरोपी मुकेश सिंह याची दया याचिका यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळली आहे. क्युरेटिव्ह याचिका रद्द ठरल्यानंतर मुकेशने राष्ट्रपतींकडे दयासाठी मागणी केली होती, परंतु आता त्याच्याकडे कोणताही पर्याय उरलेला नाही.

फेसबुक पेज लाईक करा –