राहुल गांधींच्या ब्रिटिश नागरिकत्वाबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राहुल गांधींच्या ब्रिटिश नागरिकत्वाविषयी दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळून लावताना सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना दिलासा दिला आहे. राहुल गांधी ब्रिटिश नागरिक असल्याने त्यांना निवडणुक लढविण्यापासून बंदी घालावी, अशी याचिका करण्यात आली होती.

मुख्य न्यायमूर्ती रंजन गोगोई ने याचिका करणाऱ्यांना विचारले की, आपण काय करता?. यावर युनायटेड हिंदू फ्रंटचे जयभगवान गोयल आणि हिंदू महासभेचे चंद्रप्रकाश कौशिक यांनी यांगितले की, आम्ही राजकारण आणि समाज सेवा करतो. यावर न्यायालयाने एखाद्या कागदपत्रात राहुल गांधी हे ब्रिटिश नागरिक म्हटले म्हणून ते ब्रिटिश नागरिक होता का असा प्रश्न करुन त्यांची याचिका फेटाळून लावली.

सुब्रह्मण्यम स्वामी यांनीही केंद्रीय गृह मंत्रालयाकडे अर्ज करुन राहुल गांधी हे ब्रिटिश नागरिक असल्याचा दावा केला आहे. त्यावर गृह मंत्रालयाने राहुल गांधी यांना नोटीस पाठवून त्याबाबत १५ दिवसात खुलासा करण्याचा आदेश दिला आहे. राहुल गांधी व विरोधकांना अशा खोट्या नाट्या आरोपात अडकविण्याचा भाजपचा कट असल्याचा आरोप यावर होत आहे.