INX Media Case : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – INX मीडिया प्रकरणात सुप्रीम कोर्टाने काँग्रेस नेते पी चिदंबरम यांना जामीन मंजूर केला आहे. दिल्ली हायकोर्टाच्या जामीन न देण्याच्या निर्णयावर निकाल देताना सुप्रीम कोर्टाने निकाल देत त्यांचा जामीन मंजूर केला.

पी चिदंबरम यांना या प्रकरणात 21 ऑगस्ट रोजी सीबीआयने अटक केली होती. या प्रकरण चिदंबरम यांच्यासह अनेक व्यक्तीवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे सीबीआयने त्यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली होती. सध्या चिदंबरम हे INX मीडिया प्रकरणात ईडीच्या ताब्यात असून त्यांना २००७ मध्ये आयएनएक्स मीडियाला 305 कोटी रुपयांची विदेश गुंतवणूक करण्याची परवानगी देताना व्यवहारांत अनियमितता केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यानंतर 2017 मध्ये त्यांच्याविरुद्ध याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, चिदंबरम यांनी हायकोर्टाच्या 30 सप्टेंबर रोजीच्या निकालाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. त्यावर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. त्यांना एकाच प्रकरणात जामीन मिळाला असल्याने दुसऱ्या प्रकरणात ते तुरुंगातच राहणार आहेत.

 

Visit : Policenama.com