सर्वोच्च न्यायालयाची वेबसाइट हॅक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सरवोचच न्यायालयाचे संकेतस्थळ आज (गुरुवारी) हॅक झाले. या प्रकरणा मागे ब्राजीलयं हॅकर्सचा हात असण्याची शक्यता वर्तवली आता आहे. न्यायमूर्ती लोया मृत्यूप्रकरणाच्या याचिकेवरील सुनावणी नंतर काही अर्ध्या तासांतच सर्वोच्च न्यायालयाचे संकेतस्थळ हॅक झाले.

न्यायमूर्ती बी. एच. लोया यांचा मृत्यू संशयास्पद झाल्याचा आरोप करत त्यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी, या मागणीसाठी याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर लगेचच संकेतस्थळ हॅक झाले. असे तब्बल दोन तास बंद आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने तंत्रज्ञान तज्ज्ञांना यावर काही उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या http://supremecourtofindia.nic.in या संकेतस्थळावर गेल्यानंतर पानासारखे काही चित्र येऊन ‘hackeado por HighTech Brazil HacTeam’ असा मेसेज येत होता. सध्या या संकेतस्थळावर अंडर मेंटेनन्स असा मेसेज येत आहे.

या ब्राजिलियन हॅकर्सनी २०१३मध्ये सर्व भारतीय संकेतस्थळांना लक्ष्य केले होते. सोशल मीडियावर सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळ हॅक झाल्याचे सांगितले होते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी संरक्षण मंत्रालयाची वेबसाइट हॅक झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाची वेबसाइट हॅक झाल्याची धक्कादायक प्रकार समोर आला.

सर्वोच्च न्यायालयाची वेबसाइट हॅक