Supreme Court | त्रास देणे हा आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अलीकडच्या काळात होणाऱ्या आत्महत्या हा सर्वांच्या चिंतेचा विषय बनला आहे. घरगुती हिंसाचाराला कंटाळून कधी महिला आत्महत्या (suicide) करतात, तर कधी परिक्षेत मार्क कमी पडले म्हणून विद्यार्थी आत्महत्या करतात, वरिष्ठांनी अपमानीत केल्यामुळे कर्मचाऱ्याची आत्महत्या अशा बातम्या रोज येत असतात. सुसाईड नोटमध्ये (Suicide note) एखाद्याचे नाव असेल तर त्या व्यक्तीने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप (Allegations) केला जातो. यावर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टीकरण दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्पष्टीकरण देताना म्हटले की, एखाद्याने केवळ त्रास दिला हा आरोप करुन आत्महत्या केली तर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा (Crime) होत नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालने (Supreme Court) दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नागेश्वर राव (Justices Nageshwar Rao) आणि अनिरुद्ध बोस (Aniruddha Bose) यांनी हा निकाल दिला आहे. 306 आयपीसीचा (Section 306 IPC) गुन्हा होण्यासाठी आरोपींनी आत्महत्येस सक्रिय भूमिका असली पाहिजे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा व्यक्त केले आहे. 2014 मधील एका प्रकरणावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्टीकरण दिले आहे.

काय आहे प्रकरण ?
10 सप्टेंबर 2014 रोजी रोशनबी ही आपला पती फेरोजखान याचे घर सोडून वडिलांकडे निघून गेली. 30 सप्टेंबर 2014 मध्ये फेरोजखानने विष प्राशन (poison) करुन आत्महत्या केली. त्याने लिहिलेल्या 4 सुसाईड नोटमध्ये रोशनबीला तिचे आई-वडील परत पाठवत नाहीत. त्यांच्या त्रासामुळे आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले व आत्महत्येसाठी तिच्यासह आई-वडील जबाबदार असल्याचे लिहिले होते.

फेरोजखानच्या भावाच्या तक्रारीवरुन रोशनबी व तिच्या कुटुंबातील 2 जणांवर 306 आयपीसी (आत्महत्येस प्रवृत्त करणे) या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोषारोपपत्र (Charge sheet) पाठवल्यानंतर आरोप निश्चित होऊन न्यायालयात खटला सुरु झाला. हा खटला रद्द करावा यासाठी रोशनबीने मध्य प्रदेश उच्च न्यायालयात (Madhya Pradesh High Court) याचिका दाखल (Petition) केली. न्यायालयाने याचिका मान्य करत खटला रद्द ठरवला. फेरोजखानच्या भावाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील केले. हे अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले.

सर्वोच्च न्यायालयाचे मत

306 आयपीसीचा गुन्हा होण्यासाठी आत्महत्येस प्रवृत्त करण्यात किंवा आत्महत्येस सहाय्य करण्यात आरोपीचा सक्रिय सहभाग असला पाहिजे. आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी सक्रिय भूमिका नसताना केवळ त्रास दिला यावरुन 306 आयपीसीचा गुन्हा होत नाही.

अपिलातील मुद्दे
सुसाईड नोटवरुन प्रथमदर्शनी गुन्हा निष्णन्न होतो.
सुसाईड नोटप्रमाणे रोशनबी व तिच्या आई-वडिलांनी त्रास दिल्यामुळेच फेरोजने आत्महत्या केली. म्हणजेच त्यांनी आत्महत्येस प्रवृत्त केले.

Web Title :- Supreme Court | Harassment is not a crime of inciting suicide

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

RBI Monetary Policy | RBI पॉलिसीच्या या प्रमुख गोष्टी तुम्ही आवश्य जाणून घ्या, रेपो रेटमध्ये बदल केला का? वाचा सर्वकाही

Traffic signal | ठाण्यात सिग्नल अभावी वाहतुकीचा खोळंबा; बिल न भरल्याने महावितरणकडून वीजपुरवठा खंडित

High Court | 15 वर्षांपुढील वयाच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध बलात्कार नाही; हायकोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी