Coronavirus Lockdown : गरजवंताना WhatsApp वर नव-नवीन पध्दती आत्मसात करून ‘अशी’ पोहचवतायेत मदत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हॉट्सअ‍ॅप हे माहिती देवाण- घेवाणीसाठीचे अत्यंत लोकप्रिय अ‍ॅप आहे. मात्र कधीकधी व्हॉट्सअ‍ॅपला टाइम पास आणि फेक न्यूजचा अड्डाही म्हटले जाते. परंतु लॉकडाउनच्या निर्बंधांमधे व्हॉट्सअ‍ॅप केवळ उपयुक्त ठरत नाही तर गरजूंसाठी एक दुवा बनले आहे. ज्यामुळे मोठं- मोठ्या फ्लॅट इमारतींबरोबरच गल्ली- बोळांतही मदत पुरविली जात आहे. या लॉकडाउनच्या काळात असे काही ग्रुप आहेत जे इतरांच्या मदतीसाठी सक्रिय आहेत.

बा-बापू फूड ड्राईव्ह (गांधी) यांची अनोखी पद्धत :
व्हॉट्सअ‍ॅपवरील बा- बापू फूड ड्राइव्ह (गांधी) ग्रुप देशभरात गरजूंना शिजविलेले अन्न आणि रेशन पाठवत असल्याचे आढळून आले. जामिया मिलिया विद्यापीठात शिक्षण घेत असलेला गुलाम हसन हा या ग्रुपचा अ‍ॅडमीन आहे. त्याने सांगितले कि, दिल्लीतील दंगलीच्या वेळी आम्ही हा ग्रुप बनविला होता. जामियाच्या विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला हा गट दिल्लीच्या मध्यम वर्गीयांपर्यंतही पोहोचला. याद्वारे काही राशन आम्ही गोळा करायचो तर काही इतर लोकांकडून भेटायचे. अशाप्रकारे, आम्ही प्रत्येक विभाग आणि धर्माच्या लोकांपर्यंत अन्न पोहोचवायचो. त्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. मग आम्हाला वाटले की, आता खरी कामे सुरू झाली आहेत. हळूहळू अनेक राज्यांमधील लोक आमच्या गटात सामील झाले. आता आम्हाला दोन प्रकारचे मेसेजेस येत आहेत. एक गरजू आणि दुसरे म्हणजे गरजू लोकांपर्यंत पोचण्यासाठी आम्हाला रेशन द्यायचे आहेत असे.

मदतनीस आणि गरजूंची बनविली साखळी
गुलाम हसन यांनी सांगितले की, जसा आम्हाला संदेश मिळतो कि, भोपाळमध्ये चार कुटूंब आहेत ज्यांना रेशनची आवश्यकता आहे. त्यांनतर आपण भोपाळच्या लोकांना सांगतो. भोपाळचे लोक त्यांच्याशी संपर्क साधतात ज्यांना रेशन वाटप करायचे आहे आणि त्यांनी आम्हाला आधीच सांगितले आहे. त्यांच्याकडून रेशन घेऊन आम्ही कुटुंबियांना देतो. जर एखाद्या शहराकडून शिजवलेल्या अन्नाची मागणी होत असेल आणि तेथे आमचा सदस्य नसेल तर आम्ही त्या शहरातील स्वयंसेवी संस्थेशी संपर्क साधून गरजूंना मदत करतो.

हरियाणामध्ये किराणा दुकानदारांनी बनविला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप
हरियाणा व्यापर मंडळाच्या व्यापारांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला आहे. आतापर्यंत शहरातील 80 व्यापारी या ग्रुपशी संबंधित आहेत. यासाठी जिल्हाध्यक्ष बलाराम गुप्ता यांनी हा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला. गेल्या सहा दिवसांपासून दररोज आठ ते दहा व्यापारी स्वत: हून रेशन किटचे वितरण करीत आहेत आणि व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार कौटुंबिक क्रमांक आणि क्षेत्र निश्चित केले आहे.

दुसरीकडे मानव सेवा नावाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरुन, अनिशपाल, बजरंग कोसलीवाल आणि सुशील यादव इत्यादी दररोज फरीदाबादमधील सुमारे 2000 लोकांना फूड पॅकेट पाठवित आहेत.