उपचारात हलगर्जीपणा केल्यास डॉक्टरांविरूध्द ‘बिनधास्त’ केस करा, यापुर्वी सुप्रीम कोर्टानं नुकसान भरपाई म्हणून दिले ६ कोटी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपण साधारणतः कोणत्याही आजारासाठी डॉक्टरकडे जातो. काही वेळा आजार गंभीर असेल आणि त्या रुग्णाकडे डॉक्टरांनी योग्य ते वैद्यकीय उपचार देत नसतील तर रुग्ण दगाऊ शकतो. डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे रुग्ण दगावतो पण नातेवाईकांना त्यांच्यावर कोणतीच कारवाई करता येत नाही. त्यामुळे संताप होतो आणि ते तोडफोड, हाणामारी करतात. मात्र आता अशा डॉक्टरला कायद्याच्या कक्षेत राहुन धडा शिकवता येणार आहे. आपण डॉक्टर, हॉस्पिटल, नर्सिंग होम आणि हेल्थ सेंटर विरुद्ध केस करू शकतो.

डॉक्टर, हॉस्पिटल, नर्सिंग होम आणि हेल्थ सेंटरवर केस करताना आपण गुन्हेगारी आणि नागरी असे दोन पर्याय आहेत. गुन्हेगारी प्रकरणात डॉक्टरला तुरुगांत टाकले जाऊ शकते. तसेच तक्रार केली तर न्यायालय आपल्याला मोसमी भरपाई देऊ शकेते. अशा तक्रारींमध्ये न्यायालय पीडितेच्या बाजूने जास्तीत जास्त भरपाई करण्याचा प्रयत्न केला जातो. ज्याने डॉक्टरांमध्ये त्यांच्या कर्तव्याच्या दिशेने निष्काळजी कमी होईल आणि ते आपले काम व्यवस्थित करतील.

डॉक्टरांविरुद्ध गुन्हेगारी पद्धतीची तक्रार केली तर भारतीय दंड संहितेनुसार कलम ३०४-ए, ३३७ आणि ३३८ ची तरतूद करण्यात आली आहे. यात डॉक्टरांना सहा महिने ते दोन वर्षांसाठी शिक्षा होऊ शकते. तर सिव्हिल पद्धतीची कारवाई करणे अधिक सोपे आहे. सिव्हिल केस डॉक्टर हॉस्पिटल, हेल्थ सेंटर आणि नर्सिंग होम विरूद्धही करता येते. याव्यतिरिक्त, ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत ग्राहक फोरममध्ये चांगला मोबदला मिळू शकतो.

दरम्यान, कुणाल साह यांची पत्नी अनुराधा साह यांना ताप असताना कोलकाताच्या एएमआरआय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी तापाकडे दुर्लक्ष करत वरवरच्या गोळ्या दिल्या होत्या. त्यामुळे त्यांची एलर्जी वाढली होती. त्यामुळे त्यांची त्वचा निघत होती. त्यानंतरही तेथील डॉक्टरांनी अनुराधा यांच्या आजाराकडे दुर्लक्ष केले. त्यात २४ ऑक्टोबर १९९८मध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. त्यातनंतर कुणाल साह यांनी राज्य वैद्यकीय परिषदेत तक्रार केली होती. मात्र त्यावर डॉक्टरांना क्लीन चीट देण्यात आली होती. मात्र त्यानंतर ते न्यायालयात गेले. त्यावर आता सर्वोच्च न्यायालयाने डॉक्टरांना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. हॉस्पिटलला कुणाल साह यांना ६ कोटी ८ लाख रुपयांचा दंड तसंच ६ टक्के व्याजही देण्यास सांगण्यात आले आहे.

 ‘ही’ पेये प्यायल्यास वजन होईल कमी, शरीराला मिळेल ऊर्जा

‘वजन’ कमी करताना घाई करू नका, हळूहळू करा कमी

 ‘हे’ नैसर्गिक उपाय केल्यास घेता येईल गाढ झोप

नियमित तोंडाची स्वच्छता ठेवल्यास अनेक आजार राहतील दूर

 तंदुरुस्त राहण्यासाठी वेळापत्रकात करा थोडासा बदल

 ‘फिट अँड फाइन’ राहण्यासाठी नियमित करा हे उपाय