जमिन घोटाळा प्रकरण : धनंजय मुंडेंना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंबाजोगाईतील जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी खेरेदी करण्यात आलेल्या जमीनप्रकरणात विऱोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने देल्याने ते अडचणीत आले आहेत. औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशाला स्थगिती देण्यासाठी धनंजय मुंडे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खडपीठाचे न्यायमूर्ती टी.व्ही नलावडे आणि के.के. सोनवणे यांनी दिले आहेत. धनंजय मुंडे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने धनंजय मुंडे यांची बाजू ऐकून घेण्याची संधी मुंडे यांना दिली आहे. सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यास संधी मिळाल्यामुळे धनंजय मुंडे यांना तुर्तास दिलासा मिळाला आहे.

राजकीय सूडबुद्धीने तक्रार
जगमित्र शुगर कारखान्यासाठी कोणत्याही ट्रस्ट किंवा सरकारीची फसवणूक करून जमीन खरेदी केलेली नाही. रत्नाकर गुट्टे यांनी शेतकरी आणि बँकांची ५ हजार ४०० कोटी रुपयांची फसवणूक केली. हे प्रकरण मी लावून धरल्यामुळे राजकीय सूडबुद्धीने माझ्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मी कोणाचीही फसवणूक केलेली नाही. या प्रकरणाची सर्व कागदपत्रे, पुरावे माझ्या बाजूने आहेत. असा दावा धनंजय मुंडे यांनी केला आहे.

Loading...
You might also like