Supreme Court On Compassionate Employment | ‘अनुकंपा’च्या तत्वावर विवाहित मुलीला सुद्धा नोकरीचा अधिकार, मात्र हयात पालकाची असावी संमती; जाणून घ्या सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Supreme Court On Compassionate Employment | सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) म्हटले आहे की, अनुकंपा तत्वावर (Compassionate) विवाहित मुलीला सुद्धा नोकरी दिली जाऊ शकते. परंतु त्यासाठी हयात आई किंवा वडिल असे करण्यास इच्छुक असावेत. न्यायालयाने म्हटले की, केवळ मुलगी असणे अनुकंपा तत्वावरील नोकरी (Compassionate Employment) साठी पुरेसे नाही. (Supreme Court On Compassionate Employment)

 

न्या. अजय रस्तोगी (Justices Ajay Rastogi) आणि न्या. सी. टी. रविकुमार (Justices CT Ravikumar) यांच्या पीठाने एका विवाहित मुलीची (Married Woman) ती याचिका फेटाळली ज्यामध्ये तिने वडिलांच्या मृत्यूनंतर अनुकंपा तत्वावर नोकरीची मागणी केली होती. 17 जुलै 2013 रोजी डीएसपी पदावर तैनात तिचे वडील जितेंद्र सिंह भदौरिया यांचा मृत्यू झाला होता.

 

याचिकाकर्ती महिला सुरभी भदौरिया (Petitioner Surabhi Bhadauria) यांचे वकील दुष्यंत पराशर (Advocate Dushyant Parashar) यांनी पीठासमोर कर्नाटक राज्य विरूद्ध सी. एन. अपूर्वा प्रकरणात (State of Karnataka vs CN Apoorva Case) सुप्रीम कोर्टाने दिलेल्या व्यवस्थेचा संदर्भ देत म्हटले की,
त्या निर्णयाच्या आधारावर विवाहित मुलीला सुद्धा अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवण्याचा अधिकार आहे. (Supreme Court On Compassionate Employment)

 

यावर न्या. रस्तोगी म्हणाले की, योजनेचा नियम – 2.2 नुसार अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी सर्वायवर (आई/वडील) कडून नावाला संमती हवी,
परंतु या प्रकरणात विवाहित मुलीला अनुकंपावर नोकरीसाठी आईकडून मंजूरी मिळालेली नाही.

यावर वकील पराशर यांनी म्हटले की, विवाहित मुलीला अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी तिच्या आईकडून मंजूरी मिळालेली नाही,
परंतु सध्या तरतुदी अंतर्गत ती व्यक्तीगत अधिकार म्हणून अनुकंपा तत्वावर नोकरीची मागणी करू शकते.
त्यांनी म्हटले की, आईने तिच्या नावाला यासाठी मंजूरी दिली नाही कारण याचिकाकर्त्या विवाहित मुलीने स्थायी संपत्तीच्या वाटणीची मागणी करत प्रकरण दाखल केले होते.

 

पराशर यांनी म्हटले की, याचिकाकर्तीचा भाऊ वकील आहे आणि तो सुप्रीम कोर्टात वकिली करतो.
याचिकाकर्ती कुटुंबात सर्वात मोठी आहे, यासाठी तिच्या आईचा तिच्या दाव्यावर आक्षेप असू शकत नाही.
मात्र, पराशर यांच्या युक्तिवादाने खंडपीठाचे समाधान झाले नाही आणि याचिका फेटाळली.

 

Web Title :- Supreme Court On Compassionate Employment | supreme court said that married daughter on basis of compassion is also entitled to job although permission of survivor should be given for this

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा